शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपाच्या स्थायी समिती सभेत गाजला अतिक्रमणांचा विषय

By admin | Updated: April 7, 2017 19:05 IST

पुढील आठवडय़ात नोटरी नसलेल्या या ठिकाणच्या सर्व अतिक्रमणांवर कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले.

जळगाव : मनपाच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत रामदास कॉलनी चौक, रामानंदनगर रस्त्यावरील अतिक्रमणांचा विषय गाजला. अखेर पुढील आठवडय़ात नोटरी नसलेल्या या ठिकाणच्या सर्व अतिक्रमणांवर कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले. नोंदणी केलेल्यांचीच पर्यायी व्यवस्था करणारआयुक्तांनी सांगितले की, ज्यांनी मनपाकडे नोंदणी केली असेल त्यांचीच पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी मनपा घेणार आहे. तसेच पुढील आठवडय़ात या सर्व अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण निमरूलन विभागाच्या अधीक्षकांना दिले. अतिक्रमणे हटविण्यास अडचण काय ?स्थायी समितीच्या सभेत मनसेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी रामदास कॉलनीच्या मु.जे. महाविद्यालयाजवळील चौकात रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांचे तसेच काही टप:यांचे अतिक्रमण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी लोकशाहीदिनात दोन-तीन वेळा तक्रारी केल्या. तसेच अतिक्रमण निमरूलन विभागाचे अधीक्षक एच.एम. खान यांच्याकडेही तक्रार केली.  मात्र या अतिक्रमणांवर कारवाई तर झालीच नाही, उलट अतिक्रमण निमरूलन विभागाचे कर्मचारी अतिक्रमणधारकांना नगरसेवकांची तक्रार आहे. त्यांना भेटून घ्या, असे सांगत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून देत कारवाई का होत नाही? याचा जाब विचारला. त्यावर अधीक्षक खान यांनी दूध केंद्राची मुदत संपली असल्याने त्यास काही मुदत दिली. तसेच टप:यांनाही मुदत दिली. तर भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करू नये असे नगरसेविका उज्‍जवला बेंडाळे यांचे म्हणणे असल्याने कारवाई केलेली नसल्याचे सांगितले. त्यावर बेंडाळे यांनी टपरीधारकांवर कारवाई करू नका, असे सांगितलेले नाही. केवळ भाजीपाला विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी मनपानेच आम्हाला पत्र देऊन जागा सुचविण्यास सांगितले असल्याने पर्यायी व्यवस्था होईर्पयत कारवाई करू नका, असे सांगितले. मात्र त्यांच्यावरही कारवाईस आपला विरोध नसल्याचे सांगितले.सर्वच अतिक्रमण पूर्वीसारखेचनगरसेवक जोशी यांनी शहरातील सर्वच अतिक्रमण पूर्वीसारखे झाले आहे. मग हे नवीन भाजीपाला विक्रेते कुठून आले? असा सवाल केला. तर नगरसेविका बेंडाळे यांनी रामानंदनगर रस्त्यावरील निम्मे अतिक्रमण अद्यापही जैसे-थेच असून गिरणा टाकीच्या भिंतीलगतही पक्के अतिक्रमण झाले आहे. त्यावरही कारवाई झालेली नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.  तर नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी आरटीओ ऑफीजवळील अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली.