शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा केद्रांमध्ये जॅमर बसविण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:58 IST

कॉपी सारखे गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना सुरु

जळगाव : मोबाईलच्या माध्यमातून होणारी कॉपी आणि पेपर फुटीचे प्रकार रोखण्यासाठी परीक्षा केद्रांमध्ये जॅमर बसविण्याच्या सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (दिल्ली) देण्यात आल्या असून त्याबाबतचे पत्र उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला प्राप्त झाले आहे़ तसेच युजीसीने केलेल्या सूचनांची माहिती विद्यापीठाकडून महाविद्यालय व परिसंस्थांना कळविण्यात आली आहे़सावधगिरी म्हणून विद्यापीठ आणि महाविद्यालयकडून आधीच परीक्षा काळात मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे़ तरी देखील काही कॉपी बहाद्दरांकडून मोबाईलचा छुपा वापर करून कॉपी केली केली जाते तर कधी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पेपर फुटीचा प्रकार घडता़ त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाचे प्रा़ रजनीश जैन यांनी परीक्षेच्यावेळी महाविद्यालयांमधील परीक्षा केद्रांवर जॅमर बसविण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना विद्यापीठांना केल्या आहेत़विशेष म्हणजे, परीक्षा केद्रांमध्ये कोणत्या प्रकारचे जॅमर बसवावे याबाबतच्या मॉडेलची यशस्वीरित्या तपासणी करण्यात आली असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पत्रात नमूद केले आहे़आयोगाच्या सूचनांची माहिती कळविलीविद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) विद्यापीठाच्या कुलगुरूंना व उच्च शिक्षण संहसचालक कार्यालयांना केलेल्या सूचनांचे पत्रक विद्यापीठ व उच्च शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे़ परीक्षा काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी यूजीकडून केलेल्या सूचनांचे माहिती महाविद्यालयांना व परिसंस्थांना कळावी म्हणून विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून पत्र पाठविण्यात आले आहे़ तसेच विविध परवानगी घेण्यात आल्यानंतर परीक्षा केद्रांमध्ये आगामी काळाच्या परीक्षांपासून जॅमर बसविण्याच्या सूचनाची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाण्याची शक्यता आहे़नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या!विद्यापीठ, महाविद्यालयांनी जॅमर बसविताना केंद्र सरकारच्या जॅमर धोरणाच्या नियमांची काटेकोटपणे अंमलबजावणी करण्याचेही विद्यापीठ अनुदान आयोगाने पत्रकात नमूद केले आहे़ तसेच जॅमर बसविल्यानंतर परीक्षा केंद्र परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचीही सूचना केली आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव