कुणाचे किती हात-पाय अडकले चौकशीत समोर येईलच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:26 IST2020-12-05T04:26:15+5:302020-12-05T04:26:15+5:30

जळगाव : बीएचआर संस्थेतील अपहार प्रकरणात कोणाचे किती हात-पाय अडकले आहे, हे चौकशीच समोर येईलच, असा टोला पालकमंत्री गुलाबराव ...

An inquiry will reveal how many limbs are involved | कुणाचे किती हात-पाय अडकले चौकशीत समोर येईलच

कुणाचे किती हात-पाय अडकले चौकशीत समोर येईलच

जळगाव : बीएचआर संस्थेतील अपहार प्रकरणात कोणाचे किती हात-पाय अडकले आहे, हे चौकशीच समोर येईलच, असा टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कोणाचे नाव न घेता लगावला.

जळगाव जिल्हा शिवसेनेची बैठक शुक्रवारी शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात झाली. त्यादरम्यान गुलाबराव पाटील हे पत्रकारांशी बोलत होते. त्या वेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. इतर राजकीय मुद्द्यांवर टीका करीत असताना त्यांनी बीएचआरसंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, या प्रकरण्याची सध्या चौकशी सुरू आहे. त्याविषयी अधिक बोलणे योग्य नाही. मात्र या चौकशीत कोणाचे किती हात-पाय अडकले आहे, हे लवकरच स्पष्ट होईल. ही प्रतिक्रिया देऊन या विषयावर अधिक बोलणे त्यांनी टाळले.

Web Title: An inquiry will reveal how many limbs are involved