शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

भूजल पातळीत सव्वादोन मीटरपर्यंत वाढ

By admin | Updated: January 15, 2015 15:03 IST

जिल्हातील १५ तालुक्यांमध्ये सव्वादोन मीटरपर्यंत भूजल पातळीत वाढ झालेली असल्याचे दिसून आले आहे.

सात तालुक्यात एक मीटरपर्यंत वाढ : भुसावळ, यावल व धरणगावही चांगली परिस्थिती

सुधाकर जाधव■ जळगावभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेव्दारे जिल्ह्यातील निरीक्षण विहिरींमधील स्थिर भूजल पातळीची वाचने सप्टेंबर अखेर घेण्यात आलेली असून त्याची तुलना मागील पाच वर्षाच्या सप्टेंबर अखेरच्या सरासरी स्थिर भूजल पातळीशी करण्यात आली. त्यानुसार जिल्हातील १५ तालुक्यांमध्ये सव्वादोन मीटरपर्यंत भूजल पातळीत वाढ झालेली असल्याचे दिसून आले आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेव्दारे दरवर्षी सप्टेंबर अखेर झालेले एकूण पर्जन्यमान व त्याची सरासरीच्या तुलनेच्या आधारे निरीक्षण विहिरीच्या स्थिर भूजल पातळीत सरासरीच्या तुलनेत सप्टेंबर अखेर झालेली वाढ अथवा घट याबाबत अभ्यास करण्यात येतो. त्या आधारे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार्‍या संभाव्य गावांची यादी तयार केली जाते. दरम्यान, टंचाईमुक्त महाराष्ट्र २0१९ अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १४६ गावांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षात टँकर असलेल्या, पन्नास टक्क्यांच्या आत पाऊस पडलेल्या गावांचा या अभियानात समावेश करण्यात आला. पहिला टप्पा जानेवारी २0१५ ते जानेवारी २0१६ तर दुसरा टप्पा जानेवारी २0१६ ते मार्च २0१५ या कालावधित राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत तीन वर्षात ही सर्व गावे टॅंकरमुक्त करण्याचा उद्देश आहे. या अभियानांतर्गत सिमेंट नाला, विहीर पुनर्भरण, बांध बंदिस्ती, पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रम राबवून जमिनीतील पाणी पातळी वाढविण्यात येणार आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेव्दारे गावांच्या पाण्याचा ताळेबंद तयार करण्यात आला आहे. 

सात तालुके अवर्षण प्रणव

जिल्ह्यातील एकूण १५ तालुक्यांपैकी जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, अमळनेर, पारोळा, चाळीसगाव व पाचोरा हे सात तालुके अवर्षण प्रवण क्षेत्रात येतात.

तालुकानिहाय निरीक्षण विहिरींची संख्या

■ मुक्ताईनगर-११ ■ रावेर-१0■ भुसावळ-७ ■ बोदवड-६ ■ यावल-७ ■ जामनेर-२४ ■ जळगाव-१५ ■ धरणगाव-७ ■ एरंडोल-४ ■ चोपडा-१४ ■ अमळनेर-१४ ■ पारोळा-१६ ■ पाचोरा-१४ ■ भडगाव-८ ■ चाळीसगाव-२१

कोणत्या तालुक्यात किती वाढ?

बोदवड, जामनेर, अमळनेर, पारोळा, पाचोरा, भडगाव व चाळीसगाव या सात तालुक्यांमध्ये भूजल पातळी 0ते १ मीटरने वाढली आहे. जळगाव, रावेर, चोपडा, एरंडोल, मुक्ताईनगर या तालुक्यांची १-२ मीटर तर भुसावळ, धरणगाव व यावल तालुक्याची पाणी पातळी २-३ मीटरने वाढली आहे. ९२.७४ टक्के पाऊस यावर्षी सप्टेंबर अखेर सरासरी पर्जन्यमानाच्या ९२.७४ टक्के पाऊस झाला आहे. एरंडोल, यावल, चोपडा, जळगाव व धरणगाव तालुका वगळता बाकी सर्व तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत यावर्षीच्या पर्जन्यमानात घट आढळून येते. वाढ झालेल्या पाच तालुक्यांचे पर्जन्यमानात सरासरीच्या तुलनेत २.६६ ते २६.४३ एवढी वाढ दिसून येते. मुक्ताईनगर, जामनेर व बोदवड तालुक्यात पर्जन्यमान घटले भडगाव व अमळनेर तालुक्याच्या पर्जन्यमानात 0 ते १0 टक्के पर्यंत घट, रावेर, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा व भुसावळ या तालुक्यात १0 ते २0 टक्क्यांपर्यंत घट आणि मुक्ताईनगर, जामनेर व बोदवड या तालुक्यात २0 ते ५0 टक्क्यापयर्ंत घट आढळून आलेली आहे.