शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

भुसावळात इनरव्हील क्लबतर्फे विसावा बागेचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 5:57 PM

इनरव्हील क्लबतर्फे विसावा बागेचे उद्‌घाटन करण्यात आले.

भुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळतर्फे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याअंतर्गत माऊली नगरात इनरव्हील विसावा बागेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी रजनी संजय सावकारे, डिस्ट्रिक्ट चेअरमन मीनल लाठी, डॉ.रश्मी शर्मा, क्लब अध्यक्ष शीतल भराडे, राखी भराडे, अनिता खंडेलवाल, नोयना टेकवाणी, मनीषा तायडे, नूतन फालक यांची उपस्थिती होती. वृक्षमित्र प्रमोद शुक्ला यांचे सहकार्य लाभले. रोटरी हॉलमध्ये विविध कार्यक्रम पार पडले. गणेशवंदना एन्जल क्लबच्या सदस्य राधिका मंत्री, प्रेरणा मंडोरे, खुशबू भराडिया, खुशी मंत्री, दिव्या भराडिया यांनी सादर केली. स्वागत गीत वीणा लाहोटी, शशिकला लाहोटी व राधिका लाहोटी यांनी सादर केले. प्रसंगी डॉ.रश्मी शर्मा यांना ऑनर्ड अॅक्टीव मेंबर म्हणून सन्मानित करण्यात आले. क्लबच्या रत्नकांता अग्रवाल यांचे मीनल मराठे यांनी स्वागत केले.डिस्ट्रिक्ट चेअरमन मीनल, पीडीसी रत्नकांतजी आगरवाल, रश्मी शर्मा, शीतल भराडे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेस्थानकावर दोन वेडींग मशीन देण्यात आल्या. तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये धूम्रपान विरोधी पोस्टर लावण्यात आले. मोहिनी हिला एज्युकेशन किट व मोबाईल देण्यात आला. तसेच गरजू १५ विद्यार्थिनींना वह्या तसेच पेन्सील तसेच १५ गरजूंना उबदार  कपडे वाटप करण्यात आले. प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी दोन हजार कापडी पिशव्या तयार करून वाटप करण्याचा संकल्प केला. उपक्रम यशस्वीतेसाठी कांचन जोशी, मनीषा तायडे, राखी भराडे, शशिकला लाहोटी, सुनंदा भारुडे, जयश्री दवे, क्लब सचिव रुचिका शर्मा, उपाध्यक्षा वंदिता पारे, माजी अध्यक्ष स्वाती देव, राजेश्री कात्यायनी, सविता शुक्ला, अलका भाटकर व क्लब सदस्यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ