शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात रस्त्यांच्या थर्ड पार्टी ऑडीटवरून ‘टोलवाटोलवी’

By अमित महाबळ | Updated: February 24, 2023 19:09 IST

जळगावात रस्त्यांच्या थर्ड पार्टी ऑडीटवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. 

जळगाव: महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून जळगाव शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांविषयी नागरिकांच्या तक्रारी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात पाहणी करून रस्त्यांचे थर्डपार्टी ऑडीट करण्याची घोषणा केली होती. परंतु, अद्याप याचे आदेश निघालेले नाही. यामध्ये प्रशासकीय यंत्रणा टोलवाटोलवी करत असल्याचे दिसून येत आहे.

राज्य शासनाकडून जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी ३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होत आहेत, तर महापालिका फंडातून १० कोटी रुपयांची कामे केली जात आहेत. परंतु, कामात दर्जा नाही, शास्त्रशुद्ध पद्धतीने रस्ते होत नसल्याचा सूर जळगावकरांमधून आहे. काही लोकप्रतिनिधींनी देखील या कामांच्या दर्जावर बोट ठेवले होते. दीड महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शहरातील रस्त्यांची पाहणी केल्यानंतर थर्ट पार्टी ऑडीट करण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. 

अधिकारी म्हणतात...जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी या संदर्भातील पत्र महापालिकेला पाठविले असल्याचे सांगितले. मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांनी तीन लाखांच्या वरील कामांची देयके थर्ड पार्टी ऑडीट झाल्यावरच देण्यात येत असल्याचे सांगितले. बांधकाम विभागाचे प्रमुख व शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांनी कामांची देयके आल्यावर थर्ड पार्टी ऑडीट करण्याचे आदेश देण्यात येतात. ऑडीटमध्ये त्रुटी निघाल्यास तेवढी दुरुस्ती मक्तेदाराकडून करून घेतली जाते, असे सांगितले. जिल्हाधिकारी यांचे पत्र दोन दिवसापूर्वीपर्यंतच्या टपालात महापालिकेते आलेले नव्हते, असेही सोनगिरे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव