जायचं असेल तर सरळ जा, मात्र धोका देऊ नका; गुलाबरावांनी ठणकावलं

By सुनील पाटील | Published: January 7, 2024 02:11 PM2024-01-07T14:11:37+5:302024-01-07T14:12:02+5:30

गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांना ठणकावले : विरोधकांकडे समाज हेच भांडवल

If you want to go, go straight, but don't risk it; Gula Rao patil said | जायचं असेल तर सरळ जा, मात्र धोका देऊ नका; गुलाबरावांनी ठणकावलं

जायचं असेल तर सरळ जा, मात्र धोका देऊ नका; गुलाबरावांनी ठणकावलं

जळगाव: निवडणुका आल्या की इकडून तिकडे जाणाऱ्यांची संख्या बरीच असते, मात्र ज्यांना जायचं असेल त्यांनी सरळ जावे धोका देऊ नका. आणि राहायचे असेल तर सरळ रहा, अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ठणकावले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची जळगाव लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक रविवारी अजिंठा शासकीय विश्रामगृहावर झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख सुनील चौधरी, आमदार किशोर पाटील, जिल्हाप्रमुख निलेश पाटील, सरिता माळी- कोल्हे, शहर संघटक ॲड.दिलीप पोकळे, ज्योती चव्हाण आदी उपस्थित होत्या.

विरोधकांकडे सध्या बोलण्यासारखं काहीच नाही, त्यामुळे समाज या नावाचे ते भांडवल करतील.कार्यकर्त्यांनी मात्र त्याला बळी पडू नये. आजही ८० टक्के मराठा समाज आपल्या सोबत आहे. पाच वर्ष ही मंडळी कुठेच नव्हती, पण आता दिशाभूल करण्याचे काम करीत आहे. आम्ही माणूस म्हणून काम करतो हेच लोकांना पटवून द्या. आम्ही अधिकाराने तुमची कामं करतो, त्याच अधिकाराने तुम्ही आता आमची कामे करा, अशी अपेक्षाही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. आता प्रत्येक मतदारसंघात कसरत सुरू आहे. पहिल्यावेळी निवडून येणार सोपं आहे.दुसऱ्या वेळी कठीण आहे तर तिसऱ्या वेळी महाकठीण आहे.

अपेक्षा व्यक्त करणं गैर नाही

अमुक जागा आपल्या पक्षाला सोडावी किंवा अमुक जागेवर एखाद्याने निवडणूक लढवण्याची अपेक्षा करणे यात गैर काहीच नाही. शेवटी निर्णय हा पक्षश्रेष्ठ घेणार आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात आपल्या पक्षाचे पूर्वी तीन आमदार होते आणि आजही तीन आहेत. या तिघांची कामेही चांगली आहेत, त्यामुळे पक्षाला चांगली संधी आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय पक्षाचा आढावा घेण्यात आला.

Web Title: If you want to go, go straight, but don't risk it; Gula Rao patil said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.