शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री निसर्गतः अबला नसते, तर ती घडविली जाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:21 IST

अध्यक्षस्थानी निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी एच.टी. माळी होते. युवा कल्याण प्रतिष्ठान संचलित विचार प्रबोधन अभियानांतर्गत ‘महिला सक्षमीकरण पुरुष मानसिकतेची भूमिका’ ...

अध्यक्षस्थानी निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी एच.टी. माळी होते. युवा कल्याण प्रतिष्ठान संचलित विचार प्रबोधन अभियानांतर्गत ‘महिला सक्षमीकरण पुरुष मानसिकतेची भूमिका’ व ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ या दोन विषयांवर १५ ते ३० या वयोगटासाठी निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्यात ३६ मुली व सात मुलांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण येथील लायन्स-आयएमए हॉल येथे झाले. माळी म्हणाले की, शोषक, तर शोषण करत राहणार आहेत. कारण त्यात त्याचा फायदाच आहे. मात्र, शोषितांनी शोषकाविरुद्ध लढा सुरूच ठेवला पाहिजे. आधार संस्थेच्या डॉ. भारती पाटील यांनीही मार्गदर्शन केले.

युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी पाच वर्षांत राष्ट्रीय स्त्री-पुरुषांवर अभ्यासपूर्ण सादरीकरण करणारे १ हजार वक्ते तयार करणार, असा मानस व्यक्त केला. जी.एस. हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक स.सु. बोरसे (८९) यांनी आवेशपूर्ण भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

निबंध स्पर्धेचा निकाल असा- प्रथम - केतकी पुरुषोत्तम सोनवणे, द्वितीय- मयुरी मधुकर भोई, तृतीय- कोमल शैलेश झाबक, कविता सुरेश पाटील, तर ऐश्वर्या संजय सोमवंशी, कल्याणी हेमंत महाजन, रितुजा संभाजी पाटील, वैष्णवी मच्छिंद्रनाथ पाटील यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.

यावेळी नीलेश शिवाजी पाटील यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. विशेष कार्य करणाऱ्या तिलोत्तमा रवींद्र पाटील, संदीप घोरपडे, राष्ट्रवादी विद्यार्थ्यांचे नेते भूषण भदाणे, सुनील शिंपी, श्रीनाथ पाटील, सनी गायकवाड, अनिरुद्ध शिसोदे, सारांश सोनार, योगेश घोडके यांचा सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन बन्सीलाल भागवत यांनी केले. वाल्मीक मराठे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी एस.एम. पाटील, छाया सोनवणे, विठ्ठल पाटील, डी.एम. पाटील, डॉ. राहुल निकम, संदीप जैन, राजू पाटील, यतीन पवार, बाळू बिऱ्हाडे यांनी परिश्रम घेतले.