शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प बाधित तरुणांना रोजगार न दिल्यास काम बंद पाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:17 IST

दीपनगर – प्रकल्प बाधित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुन्हा दीपनगर येथील ६६० मेगावॅट प्रकल्प कार्यालयात शिवसेना ...

दीपनगर – प्रकल्प बाधित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुन्हा दीपनगर येथील ६६० मेगावॅट प्रकल्प कार्यालयात शिवसेना पदाधिकारी धडकले. यावेळी संबंधित तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात येऊन संबंधित अधिकाऱ्यांना आठ दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. आठ दिवसात संबंधितांनी रोजगार उपलब्ध करून न दिल्यास प्रकल्पाच्या कामास कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, दोन दिवसापूर्वी वेल्हाळेसह परिसरातील प्रकल्प बाधित अनेक बेरोजगारांनी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या निवासस्थानी येऊन चर्चा करीत निवेदन दिले होते. त्यावेळेस त्यांनी प्रकल्पाचे मुख्य अभियंता विवेक रोकडे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केल्याप्रमाणे बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजता सर्व बेरोजगार तरुण व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन , कार्यालयीन उपजिल्हाप्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक धीरज पाटील , संतोष माळी यांचेसह चर्चेसाठी कार्यालयात प्रकल्प बाधित बेरोजगार तरुण व

या प्रकल्पाचे मुख्य अभियंता विवेक रोकडे, स्थापत्यचे उपअभियंता तायडे , भेल कंपनीचे व्यवस्थापक एस. बी. जावळे, वेल्फेअर ऑफिसर एस. टी. वासुदेव यांचेसह विविध कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्य अभियंता विवेक रोकडे यांनी येत्या आठ दिवसात रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी पाॅवरमॅक कंपनीचे डी. एन. सिंग, बी. जे. सी. एल. चे प्रमुख अधिकारी यांचेसह वेल्हाळे व वरणगाव तसेच परिसरातील बेरोजगार तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.