मी राजकीय क्षेत्रातला संकटमोचक तर दुष्काळाचा संकटमोचक निसर्ग - गिरीश महाजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 18:20 IST2019-06-10T18:20:22+5:302019-06-10T18:20:47+5:30

मी राजकीय क्षेत्रातला संकटमोचक आहे. दुष्काळाचा संकटमोचक  निसर्ग आहे

I am political trouble-Shooter - Girish Mahajan | मी राजकीय क्षेत्रातला संकटमोचक तर दुष्काळाचा संकटमोचक निसर्ग - गिरीश महाजन

मी राजकीय क्षेत्रातला संकटमोचक तर दुष्काळाचा संकटमोचक निसर्ग - गिरीश महाजन

जळगाव : आगामी काळात नदी जोड प्रकल्पाला प्राधान्य असेल. केंद्राकडून  न  मिळाल्यास राज्य निधी उभारून १३ ते १४ हजार कोटींचा निधी या प्रकल्पासाठी देईन,  अशी माहिती जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे नवे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मी राजकीय क्षेत्रातला संकटमोचक आहे. दुष्काळाचा संकटमोचक  निसर्ग आहे, ओव्हर कमी आणि रन जास्त काढायचे असल्याचेही  ते म्हणाले.
 
पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर महाजन यांचे  सोमवारी दुपारी प्रथमच  जळगावात आगमन झाले.  त्यांचे रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

मी राजकीय क्षेत्रातला संकट मोचक आहे. दुष्काळाचा संकट मोचक  निसर्ग आहे.  निसर्गापुढे कुणाचेही चालत नाही. यंदा चांगला पाऊस पडावा अशी प्रार्थना आपण सर्व करू या.. असेही ते म्हणाले. 

ओव्हर कमी रन जास्त
हाती आता फार काळ नाही. तीन चार महिने आहेत. ‘ओव्हर कमी आणि रन जास्त’ अशी आपली स्थिती आहे. तीन- चार महिनेच काय ते हाती आहेत. त्यात त्यात जिल्ह्याला जास्तीत जास्त न्याय मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असेल.  
 
स्वागतासाठी आणला हत्ती
दरम्यान, गिरीश महाजन यांच्या स्वागत यात्रेसाठी त्यांना हत्तीवर बसवून मिरवणूक काढण्यात येणार होती.  काही कार्यकर्त्यांनी सजविलेली उघडी जिपही रेल्वे स्थानकावर आणली होती. मात्र प्रचंड गर्दी व उन्हामुळे महाजन यांनी  हत्तीवरून वा उघड्या जिपवरून मिरवणूक काढण्यास नकार देत थेट चारचाकी वाहनाकडे जाणे पसंत केले.   तेथून त्यांनी सर्वांना अभिवादन करत अजिंठा विश्रामगृह गाठले.

Web Title: I am political trouble-Shooter - Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.