शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

‘हास्यधारे’च्या हास्यकल्लोळात ओले चिंब झाले रसिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 1:10 AM

जळगाव येथील व.वा. वाचनालयाच्या १४२व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हास्य धारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याविषयी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत सांस्कृतिक या सदरात लिहिताहेत अशफाक पिंजारी...

वात्रटिका म्हणजे काय हो? तर वात्रटिका म्हणजे अशी हास्यकविता ज्यात अतिशयोक्ती असते, विडंबन असते, मिश्किलपणा, थट्टेखोरपणा असतो, मर्मावर बोट ठेवण्याची वृत्ती असते आणि दांभिकतेवर प्रहार केलेला असतो. या वात्रटिकेत शब्दांना जितके महत्व असते तितकेच महत्व त्याच्या सादरीकरणाला असते. आज वात्रटिका म्हटले की जे नाव प्रामुख्याने डोळ्यांसमोर येते, ते म्हणजे रामदास फुटाणे.जळगाव येथील व.वा. वाचनालयाच्या १४२व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हास्य धारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात रामदास फुटाणे यांनी ‘हवा येते हवा जाते..., बदलतात रंग..., काँग्रेस होती नोकिया आणि भाजप सॅमसंग.. या विडंबन काव्यासह विनोदी कवितांनी रसिक अक्षरश: लोटपोट झाले आणि या ज्येष्ठ कवीच्या कवितांनी जगण्याचा संदेशही दिला.‘कधी कधी माझा देश आहे...’ फेम या वात्रटिकाकाराने विनोदी फटकेबाजी करीत हास्याचा फुलोरा फुलविला. या बहारदार कार्यक्रमाद्वारे रसिकांना एकाहून एक सरस हास्यकविता ऐकण्याची संधी उपलब्ध झाली. जणू काही पावसाळी वातावरणात एकप्रकारे नामवंत कवींच्या हास्य धाराच या वेळी बरसत होत्या.शतकोत्तर व.वा.वाचनालयाचा वर्धापन दिन दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमांची मेजवाणी घेऊन येत असतो. त्यानुसार यंदाचा वर्धापन दिन पावसाळी वातावरणात पाऊस धारांसह ‘हास्य धारा’ घेऊन आला होता. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे आपल्या विडंबन काव्याने जळगावकर रसिकांना रामदास फुटाणे यांनी सूत्रसंचालन करून आपल्या खुमासदार आणि मिश्किल शैलीने कार्यक्रमात रंगत आणली.या कार्यक्रमात सादर होणाऱ्या प्रत्येक काव्यपंक्तींना हंशा आणि टाळ्यांचा पाऊस पडत होता. हास्य-विनोद अनुभवण्याची संधी ‘हास्य धारा’च्या माध्यमातून व.वा.वाचनालयाने जळगावकर रसिकांना उपलब्ध करून दिली होती. ही खरे म्हणजे आम्हा रसिकांसाठी पर्वणीच होती.यासोबतच दीर्घकाव्य संग्रहकार तसेच नाट्यलेखक, कवी अनिल दीक्षित (पुणे) यांनी नोटाबंदीवर सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्याच्या चालीवर कविता सादर केली.ललित लेखक, कवी साहेबराव ठाणे (अहमदनगर) यांनी शेती, माती आणि ग्रामीण जीवनावरील कविता सादर करून खेड्यातले वास्तव मांडले. ज्यांच्या कविता दूरचित्रवाणीवरून राज्यभरात पोहचलेल्या असे कवी भरत दौडकर (शिक्रापूर) यांनी जमिनीच्या गुंठेवारीवरील कविता सादर केली. चित्रपट गीतकार, गझलकार, ‘जळणाराल्या विस्तव कळतो... बघणाºयाला नाही, जगणाºयाला जीवन कळते... पळणाºयाला नाही’ ही मार्मिक कविता कवी नितीन देशमुख (चांदूरबाजार) आणि कवी नारायण पुरी (तुळजापूर) या नामवंत कवींनी ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ ही विनोदी कविता सादर करून रसिकांची दाद मिळविली. अशा नामवंत कवींच्या कविता ऐकण्याचा हा आनंददायी सोहळा जळगावकर रसिकांना अनुभवता आला. नव्हे तर तो सोहळा रसिकांच्या कायम स्मृतीत राहणार आहे.-अशफाक पिंजारी, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव