शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसेवा ऑक्सीजनवर

By admin | Updated: March 28, 2017 00:13 IST

हेळसांड : ईएसआयसीत अनेक पदे रिक्त

जळगाव : खाजगी क्षेत्रातील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना रुग्णसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने त्यांना ईएसआयसीचे सुरक्षा कवच दिले आहे. मात्र जळगाव कार्यालयातील डॉक्टर व कर्मचा:यांची रिक्तपदे व रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे उपचाराला विलंब होत असून  त्यामुळे शहरातील दोन सेवा दवाखान्यासमोर सोमवारी सकाळी रुग्णांच्या रांगा लागलेल्या होत्या.खाजगी व्यवसाय क्षेत्रात काम करणा:या सर्व कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना उपचार मिळावे             यासाठी केंद्र व राज्य शासनाने ईएसआयसीच्या कक्षेत आणले आहे. या रुग्णांना उपचार मिळावे, यासाठी ईएसआयसीतर्फे अयोध्या नगर व जिल्हा न्यायालयासमोरील जागेत असे दोन सेवा दवाखाने सुरू आहेत.उपचारासाठी प्रतीक्षासेवा दवाखान्यांसाठी डॉक्टराची तीन, परिचारिका 1, लिपीक 1, औषध निर्माता 2, शिपाई 3, ड्रेसर 1, स्विपर 1 अशी पदे मंजूर आहेत. मात्र सद्यस्थितीला डॉक्टरांची दोन पदे, परिचारिका, लिपीक, शिपाई व ड्रेसर तसेच औषध निर्माताचे एक पद रिक्त आहे. मोठय़ा प्रमाणात पदे रिक्त असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्ण व कुटुंबीयांना प्रतीक्षा करावी लागत आहे.सध्या डॉ.आर.बी.चव्हाण हे इनचार्ज डॉक्टर तर डॉ.एस.डी.फालक यांची तात्पुरती नियुक्ती आहे. सोमवारी सकाळी सेवा दवाखान्यामध्ये रुग्णांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होती.  ओपीडीमध्ये वाढईएसआयसी अंतर्गत सुरुवातील जळगाव औद्योगिक वसाहत भागातील सुमारे 22 हजार कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना सामावून घेतले होते. मात्र या योजनेत आता छोटय़ा मोठय़ा सर्वच उद्योगातील कामगार तसेच तालुकास्तरावरील कंपन्यांमधील कामगारांचा समावेश केल्याने ही संख्या सुमारे 40 हजारांर्पयत पोहचली आहे. त्यामुळे जिल्हा न्यायालय परिसर व अयोध्या नगरातील सेवा दवाखान्यांमध्ये सुरुवातीला 90 ते 95 र्पयत होणारी ओपीडी (बाह्य रुग्णसेवा) ही आता रोज 200 र्पयत पोहचली आहे.इएसआयसीच्या लाभार्थीची  संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे दररोज रुग्णांची गर्दी वाढत आहे. जिल्ह्यातील अनेक कंपन्या जोडल्या गेल्याने ही संख्या वाढली आहे.              -डॉ. राजेंद्र चव्हाण,           प्रमुख वैद्यकीय अधिकारी