शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग बायपासचे काम लेंडी नाल्याजवळ थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : महामार्ग चौपदरीकरणाचे तरसोद ते फागणे या टप्प्यातील बायपासचे काम जळगाव- ममुराबाद दरम्यान लेंडी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद : महामार्ग चौपदरीकरणाचे तरसोद ते फागणे या टप्प्यातील बायपासचे काम जळगाव- ममुराबाद दरम्यान लेंडी नाल्याजवळ येऊन थांबले आहे. आधीच बायपासचे काम संथगतीने सुरू असताना पावसाळ्यात नाल्याचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहतते त्यामुळे या कामाला मोठा ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पाळधी ते तरसोद फाटा दरम्यान प्रस्तावित असलेला बायपास महामार्ग पूर्णत्वास आल्यानंतर ममुराबाद तसेच परिसरातील असोदा, भादली, आव्हाणे, फुपनगरी, कानळदा, विदगाव, डांभुर्णी, किनगाव भागातील वाहनधारकांना जळगाव शहरातून न जाता बाहेरून कमी वेळात व कमी अंतरात एरंडोल धरणगाव तसेच नशिराबाद, भुसावळकडे जाणे शक्य होणार आहे. सद्यःस्थितीत वाहनधारकांना जळगाव शहरातील वाहतुकीच्या कोंडीतून वाट काढतच मार्गक्रमण करावे लागते. त्यात बराच वेळ खर्च होऊन इच्छित स्थळी पोहोचण्यास उशीर होतो. बायपास पूर्णत्वास आल्यानंतर वाहने थेट पाळधी व तरसोद फाट्यावर जातील. साहजिक जळगाव शहरातील वाहतुकीवरचा ताण कमी होईल. अपघातांचे प्रमाणही बऱ्याचअंशी कमी होऊ शकेल. त्यादृष्टीने बायपासचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ममुराबाद रस्त्याच्या दोन्ही बाजूला बायपास रस्त्याचे मार्किंग करून खुणा गाडल्या आहेत. प्रत्यक्षात बायपासच्या कामाला लेंडी नाल्याच्या पलिकडे कोठेही सुरूवात नसल्याने संबंधित शेतकरी अजूनही मार्किंग केलेल्या शेतीत पिके घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी लेंडी नाला ओलांडून बायपासचे काम सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, आजतागायत त्याबाबतीत काहीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे परिसरातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

----------

फोटो कॅप्शन - जळगाव-ममुराबाद दरम्यान वाहणाऱ्या लेंडी नाल्याजवळ बायपास महामार्गाचे काम येऊन थांबले आहे. (जितेंद्र पाटील)