शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या नाराजीनंतर अतिक्रमणांवर हातोडा

By admin | Updated: March 23, 2017 00:23 IST

रेल्वे स्टेशनवरील घटना : गिरीश महाजन यांच्या कारचा दुचाकीला धक्का लागल्यावरून वाद

जळगाव : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कारचा धक्का लागल्याच्या कारणावरुन मंगळवारी रात्री काही जणांनी महाजन यांच्या कारचालकाशी वाद घातला. तर काही मद्यपींनी कपडे काढून रस्त्यावर धिंगाणा केला होता. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून वाद घालणा:यासह रात्री उशिरार्पयत व्यवसाय करणा:यांविरुध्द कारवाई केली. रस्त्यात लावलेल्या 16 दुचाकी जप्त करुन त्यांच्याविरुध्द दंडात्मक कारवाई केली. यावरून बुधवारी महापलिकेकडूनही सायंकाळी स्टेशन रोड परिसरात अतिक्रमण विरोधात  कारवाई करण्यात आली. यावेळीही पोलीस बंदोबस्त होता. मंत्री गिरीश महाजन हे मुंबईला जाण्यासाठी रात्री साडे अकरा वाजता रेल्वे स्थानकावर आले होते. तेव्हा पुतळ्याजवळून वळण घेत असताना त्यांच्या कारचा एका दुचाकीला धक्का लागला. त्यावरून दुचाकीस्वाराने चालकाशी वाद घातला. त्यावर चालकाने नरमाईची भूमिका घेतली. मंत्री असले म्हणून तुम्ही काहीही करणार का? असा प्रतिप्रश्न दुचाकीस्वाराने केला. यावरून  मंत्री महाजन यांनी थेट पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांना ही माहिती देऊन  कारवाईच्या सूचना दिल्या. सुपेकर यांनी तत्काळ उपअधीक्षक सचिन सांगळे यांना घटनास्थळी रवाना केले. शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर, सहायक निरीक्षक दीपक गंधाले व कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रस्त्यात बेशिस्तपणे लावलेल्या 16 दुचाकी व हातगाडय़ा ताब्यात घेतल्या. प्रत्येकी 200 रुपये दंड आकारुन त्यांना सोडण्यात आले. दुस:या दिवशी धडक कारवाई़़़ मनपा अतिक्रमण विभागातर्फे बुधवारी सायंकाळी पोलीस बंदोबस्तात स्टेशन रोडवरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. त्यात सुमारे 20 दुकानांचे अतिक्रमण तोडण्यात आले. तसेच पुढे आलेले शेड, फलक आदीचे अतिक्रमण काढण्यात आले. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा करीत उभ्या असलेल्या हॉकर्सच्या 4 लोटगाडय़ा, तसेच नागरिकांनी रस्त्यावरच उभ्याकेलेल्या 4 मोटारसायकल्स, 4 टेबल, 1 रॅक, शटर 1, तसेच पत्र्याचे शेड जप्त करण्यात आले. मद्यपींनी घातला गोंधळ हा गोंधळ सुरु असताना काही मद्यपी कपडे काढून महाजन यांच्या कारच्या पुढे नाचत होते. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले होते. त्यामुळे स्टेशन परिसरात बराच वेळ गोंधळ सुरूहोता.