शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबादला हरिनामाचा गजर ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST

नशिराबाद: वीणेचा झंकार... टाळ मृदंग व वाद्यांचा गजर...राम कृष्ण हरी...राधाकृष्ण गोपाळ कृष्णाचा जयजयकार... आसमंतात निनादणारा हरिनामासह ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष ... ...

नशिराबाद: वीणेचा झंकार... टाळ मृदंग व वाद्यांचा गजर...राम कृष्ण हरी...राधाकृष्ण गोपाळ कृष्णाचा जयजयकार... आसमंतात निनादणारा हरिनामासह ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष ... सजीव आरास... फुगड्यांचा जल्लोष... अशा भक्तिमय वातावरणात नशिराबादला ज्ञानेश्वरी पारायण ग्राममहोत्सवाची शोभायात्रेने रविवारी जल्लोषात सांगता करण्यात आली. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या ग्राम लोकमहोत्सवात भाविक भक्तिरसात न्हाऊन निघाले. सामाजिक व धार्मिक एकात्मतेचे प्रतीक व दर्शन घडविणाऱ्या लोकोत्सवास सुमारे ३३ वर्षांची अखंड परंपरा आहे. गेल्या आठ दिवसांपासून महोत्सव सुरू होता. त्याची सांगता करण्यात आली.

सकाळपासूनच गावात सर्वत्र धार्मिक वातावरण होते. झेंडूजी महाराज बेळीकर संस्थानचे प्रमुख भरत महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर आठवडे बाजारातून दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला. अग्रभागी एक घोड्यावर ध्वजधारी होता. त्यामागे नऊवारी साडी व डोक्यावर भगवा फेटा असा पेहराव अनेक बालगोपालांनी केला होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी वारकरी पोषाख परिधान करून टाळ मृदंगाच्या गजरात पाऊली खेळत होते, तर डोक्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ व तुळशीची कुंडी घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. हरिनामाचा गजरात महिलांनी फुगड्या खेळत आनंद घेतला. दरम्यान गेले आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवात अनेक नामवंत कीर्तनकारांची प्रवचने व कीर्तने संपन्न झाली.

भजनांनी आणली रंगत

शोभायात्रेत भजनी मंडळ विविध भजने गात होती. हभप भरत महाराज, प्रभाकर महाराज, सुनील शास्त्री महाराज, सुधाकर महाराज, संजय माळी सायबू महाराज सहकारी यांनी विविध भजने सादर केली. त्या तालावर तरुण भाविक पावली खेळण्यात तल्लीन झाले होते.

लक्षवेधी सजीव आरास

दिंडी सोहळ्यात सजविलेल्या बैलगाडीवर संत ज्ञानेश्वर, मुक्ताई यांचा सजीव आरास लक्षवेधी ठरले. शोभायात्रा मार्गावर महिला व नागरिकांतर्फे ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून शोभायात्रेचे स्वागत करण्यात येत होते. मार्गावर व घरासमोर भव्य रांगोळ्या काढून अंगण सजविण्यात आले होते.

डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा महिला व पुरुषांची गर्दी होती. हा सोहळा अनेकांनी मोबाइल मध्ये नजरकैद केला तर काहींनी सेल्फीचा आनंद घेतला. ग्राममहोत्सवात बालकांसह,महिला, पुरुष, तरुण, वृद्धांनी सहभागी होऊन हरिनामाचा आनंद घेतला. हरिनामाच्या गजरात महिलांनी फुगड्या खेळल्या.

ईन्फो

लोकप्रतिनिधींच्या रंगल्या फुगड्या

लोकमहोत्सवात लोकप्रतिनिधींनी हातात टाळ घेऊन हरिनामाच्या गजरात पावली खेळली. त्यासोबत फुगड्या खेळून आनंद द्विगुणित केला. हिंदू-मुस्लीम बांधवांनी याठिकाणी सहभागी होत एकात्मतेचे दर्शन घडवले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच पंकज महाजन, शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील चंदू पाटील, किशोर पाटील, डिगंबर रोटे, पुष्कराज रोटे, किरण पाटील, सचिन महाजन, राजेंद्र पाचपांडे, सुनील पाटील आदींच्या फुगड्या रंगल्या. सर्वधर्मीय भाविक महोत्सवात सहभागी झाले होते.

यंदा शिऱ्याचा प्रसाद

दरवर्षी या ग्रामोत्सवात सुमारे ५० ते ६० पोते गव्हाचा व शेकडो क्विंटल वांग्याच्या भाजीचा महाभंडारा महाप्रसादाचे आयोजन केले जाते, मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करून फक्त शिऱ्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. ग्रामोत्सवाची परंपरा व महाप्रसादाची प्रथा खंडित होऊ नये म्हणून यंदा असा बदल करण्यात आला असल्याचे समितीकडून सांगण्यात आले.

दरवर्षी या ग्रामोत्सवात संपूर्ण गाव एकत्र येऊन मोठा महोत्सव साजरा केला जातो, मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महा भंडारा न ठेवता केवळ ऐश्वर्याचा प्रसार वाटून उत्सवाची प्रथा परंपरा अबाधित ठेवण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

छायाचित्र- प्रसाद धर्माधिकारी नशिराबाद