शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

कट्ट्यावरचा वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 4:16 PM

कट्ट्यावर ज्येष्ठांनी एकत्रित येणे आगळा अनुभव असतो. कट्ट्यावरचा वाढदिवस नेमका कसा असतो याविषयी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत जळगाव येथील आर.आर. हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय पाठक...

कट्टा म्हटला की काहींना आपले कॉलेजचे दिवस आठवतात, तर काहींना निवृत्तीनंतरचे, पण तुम्ही कट्टा मेंबर असला तर तुमचा कट्टा हा ठरलेला. ठरलेल्या जागी ठरलेल्या वेळी तुम्ही तिथे जाणार. आता बहिणाबाई उद्यान, काव्य रत्नावली चौक हे खास कट्टे. वेळेनुसार सदस्य बदलणार. आता काव्य रत्नावली चौकाचेच पाहाना. सायंकाळी पाचपासून सातपर्र्यंत सेवानिवृत्तांनी चारही बाजू भरलेल्या असतात. त्यानंतर कॉलेजियन्स, कुटुंबवत्सल यांची गर्दी सुरू होते. रात्री पाय मोकळे करायला म्हणून आपापल्या बाईकवर येणाऱ्यांची गर्दी. ही उशिरापर्यंत असते.या कट्ट्यावर येऊन बसणाऱ्यांची कळत न कळत अनेकांची ओळख होते. परिचयांची देवाणघेवाण होते. दररोजच्या भेटीतून हळूहळू आपलेपणा जाणवू लागतो. प्रसन्नपणे हास्यविनोद होऊ लागतात. तासभर वेळ कसा जातो ते कळतही नाही. दिवसांमागून दिवस गेल्यावर ही कट्ट्यावरची मैत्री अधिक घट्ट होते. मग कुणाचा तरी वाढदिवस येतो.लहानपण आठवत कुणीतरी आपल्या खिशातून चॉकलेट काढून कट्ट्यावरच्या मित्रांना देतो तर कुणी चहा बिस्कीटे देऊन वाढदिवस साजरा करतो़ या चहा बिस्किटाचा आनंद घेत असताना कट्ट्यावरचा माझा वाढदिवस अमूक तारखेचा बरं का चहाला इथे नक्की या सांगताना त्याचा चेहरा आनंदीत झालेला असतो. काव्य रत्नावली चौकात सकाळी येणाºयांमध्ये एक जोशी काका आहेत. वय फक्त ८८ अनेक वर्षांपासून सकाळी येथे येऊन बसणारे. आता त्यांना चालवत नसल्याने त्यांचा एक मुलगा बाईकवर आणून सोडतो तर दुसरा तासाभराने घरी घेऊन जातो.दुसरे चौबे काका कट्ट्यावर ओढीने मित्रांना भेटायला रिक्षाने येतात. जोशी असो वा चौबे, कट्ट्यावर आल्याचा, सर्वांना भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहºयावर वेगळाच असतो. गेल्या आठवड्यात सकाळी तेथे असणाºयांनी एकत्र येत जोशी काकांचा वाढदिवस अंगावर प्रेमाची शाल घालत साजरा केला. त्यांच्या मुलांनी हजर असलेल्या सर्वांना चहा दिला आणि वडिलांचे मित्र म्हणून हातरूमाल दिला. अनेक ओळखी-अनोळखी होते. पण कट्ट्यामुळे आपलेपणाने बांधले गेले होते.बहिणाबाई उद्यानात असाच एक कट्टा आहे. स्टेट बँकेच्या निवृत्तांचा न चुकता सायंकाळी तासभर जमतात. हास्य विनोद होतात आणि नंतर प्रत्येक जण आपापल्या घरी परततो. या ग्रुपचे सदस्य वाढदिवसाला आपल्या कट्टा मेंबर्सना अगत्याने बोलावून जेवण देतात .शेवटी कुणीही काय दिले पेक्षा किती प्रेमाने दिले हे महत्त्वाचे असते. या निवृत्तांच्या घरी वाढदिवस कसा साजरा होतो हे माहीत नसले तरी कट्ट्यावरच्या वाढदिवसाला या कट्टा मेंबर्सच्या जीवनात वेगळाच आनंद देऊन जातो , तो त्यांना सुखावून जातो हे मात्र खरे.-विजय पाठक, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव