शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

बेसमेंट प्रकरणी कारवाईसाठी गुप्ता यांचा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील अनधिकृत बांधकामाचा शोध घेऊन बेसमेंटचा बेकायदेशीर व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कारवाई करून पार्किंगसाठी जागा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील अनधिकृत बांधकामाचा शोध घेऊन बेसमेंटचा बेकायदेशीर व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कारवाई करून पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी सोमवारी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. उपायुक्त संतोष वाहुळे यांनी आठवडाभरात कायदेशीर अभ्यास करून धोरण निश्‍चित करण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन दिल्यानतंर गुप्ता यांनी आंदोलन मागे घेतले.

जळगाव शहरात विविध ठिकाणी असलेल्या व्यापारी संकुले बांधण्यात आली आहे. मात्र या व्यापारी संकुलात येणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या ताब्यातील दुचाकी वाहने लावण्यासाठी अधिकृत जागेची व्यवस्था जळगाव महानगरपालिकेने केलेली नाही. पर्यायाने वाहनधारकांना आपल्या ताब्यातील वाहने थेट रस्त्यावर लावण्याची वेळ येते. त्यामुळे शहर पोलीस वाहतूक शाखेकडून वाहनधारकांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी संकुलाच्या बेसमेंटचा अनधिकृत वापर होत असल्याने पार्किंगला जागा मिळत नाही. त्यामुळे पालिकेने ३६ बांधकामे सील करून ती निष्कासित करावी तसेच पार्किंगची व्यवस्था करावी. ९६ प्रकरणांत तत्काळ निर्णय द्यावा, १३३ प्रकरणांत अनधिकृत बांधकामांचा शोध घ्यावा घेऊन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच महापालिकेने बेसमेंटचा अनधिकृत वापर करून पार्किंगसाठी जागा न सोडणार्‍या संबंधितांचे बांधकामे सील करून निष्कासित करावी या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता सोमवारी सकाळी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या दालनात ठिय्या आंदोलनास बसले. दोन ते तीन तासानंतर उपायुक्त संतोष वाहुळे यांनी त्यांची भेट घेतली. तसेच शहरातील बेसमेंटमधील अनधिकृत वापर झालेल्या जागांच्या उर्वरित प्रकरणांमध्ये नगररचना विभाग सर्वेक्षण करून सुनावणीअंति सकारण आदेश पारित करण्यात येतील. तसेच पारित झालेल्या आंदेशाबांबत, आयुक्त, उपायुक्त, सहायक संचालक, नगररचना, विधी सल्लागार, यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक घेऊन सर्व कायदेशीर बाबींचा विचार करून धोरण निश्‍चित करण्यात येईल. तसेच या कार्यवाहीबाबत आपणास अवगत करण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन दीपककुमार गुप्ता यांना देण्यात आले. यानंतर गुप्ता यांनी आंदोलन मागे घेतले.