शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

कोरोनाविषयी अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार - पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:49 PM

जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासन व जिल्हा प्रशासन सवोर्तोपरी प्रयत्न करीत आहे. दरम्यान, सोशलमिडीयासह इतरठिकाणी अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. तसेच शाळा बंद करण्याचे आदेश असतानाही शाळा सुरु केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी दिली आहे.कोरोना विषाणू संसगार्बाबत जिल्ह्णात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्याताआली होती.त्यावेळी त्यांनी माहिती दिली. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील आदी उपस्थित होते.व्हेंटीलेटर खरेदीसाठी १० लाखतातडीची परिस्थिती उद्भवल्यास अडचण येवू नये, जिल्ह्णातील नागरिकांना तातडीने उपचार उपलब्ध व्हावेत. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयास व्हेंटीलेटर खरेदीसाठी आमदार निधीतून १० लाख रुपये देण्यात येत असल्याची माहिती ही पालकमंत्र्यांनी दिली.त्या शाळा बंद ठेवणारयासह ग्रामीण भागातील ज्या शाळांमध्ये शहरातून शिक्षक जातात अशा शाळाही बंद ठेवण्याचा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.जिल्हा रुग्णालयात कोरोना कक्षकोरोना व्हायरसाचा धोका लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालयात अशा रुग्णांसाठी १० बेड राखून ठेवण्यात आले आहे. तर ५ बेडचा स्वतंत्र कोरोना कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती डॉ. खैरे यांनी दिली. याठिकाणी तातडीच्या उपाय योजना म्हणून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना दिल्यात. कोरोना संदभार्तील उपाययोजनांविषयी पालकमंत्र्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि शासकीय आरोग्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचेकडून माहिती जाणून घेतली.कोरोनाचा कक्ष स्वतंत्र राहणारजळगाव : कोरोना कक्ष आहे त्या ठिकाणी अगदी स्वतंत्र ठेवून या ठिकाणी रूग्ण व डॉक्टरांशिवाय कोणालाही परवानगी देऊ नका, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ़अविनाश ढाकणे यांनी सोमवारी दिल्या़ त्यांनी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास या वार्डाची पाहणी केली़ या वार्ड शेजारी असलेल्या महिला वैद्यकीय वार्डाचा दरवाजा बंद करून तो बाहेरील बाजुने सुरू करण्याचे त्यांनी सांगितले़ बाहेरून या वार्डला आयसोलेशन वार्ड नाव देऊन या ठिकाणी रूग्णांच्या नातेवाईकांनाही प्रवेश देऊ नये, असे त्यांनी सांगितले़ यावेळी जिल्हाधिकाºयांनी कोरोना कक्षात दाखल रूग्णांची व कक्षाची पाहणी केली़ े

टॅग्स :Jalgaonजळगाव