मुलगी झाली हो....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:49 IST2021-01-08T04:49:32+5:302021-01-08T04:49:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वंशाच्या दिव्यासाठी अनेक जण पणती विझवून टाकतात, असे असतानाही वाघळी येथील सासर असलेल्या शिरसोलीच्या ...

The girl is born .... | मुलगी झाली हो....

मुलगी झाली हो....

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वंशाच्या दिव्यासाठी अनेक जण पणती विझवून टाकतात, असे असतानाही वाघळी येथील सासर असलेल्या शिरसोलीच्या माहेरवाशिणीला मुलगी झाली म्हणून आजी आजोबांनी ढोल ताशांच्या गजरात तीचे स्वागत केले.

शिरसोली येथील योगिता प्रतिक भोई यांना कन्यारत्न झाल्याने तिच्या आजी-आजोबांनी थाटात वंशाच्या पणतीचे स्वागत केले. यावेळी योगिता यांचे सासरे विश्वनाथ आणि सासु सुनंदा भोई उपस्थित होत्या. शिरसोली प्र.बो. येथील नाना भोई यांच्या कन्या योगिता प्रतिक भोई यांनी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात ३० डिसेंबरला मुलाला जन्म दिला. घरात पहिली कन्या आल्याने दोन्हीकडच्या मंडळीना कमालीचा आनंद झाला. त्यांनी या मुलीचे थाटात स्वागत केले. तसेच घराच्या दारावर आई आणि बाळाला ओवाळले देखील.

पती सैन्यात

योगिता हिचे पति प्रतिक भोई हे सैन्यात असुन श्रीनगर येथे कर्तव्य बजावत आहेत. ते आपल्या कन्येला भेटण्यासाठी आतूर असून लवकरच येणार देखील आहेत.

Web Title: The girl is born ....