शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

मुक्या जीवांच्या वेदनेवर तरुणाई घालणार फुंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST

जळगाव : ‘पशू ॲनिमल प्रोटेक्शन असोसिएशन’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने ‘ॲनिमल ॲम्ब्युलन्स’चे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून ...

जळगाव : ‘पशू ॲनिमल प्रोटेक्शन असोसिएशन’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने ‘ॲनिमल ॲम्ब्युलन्स’चे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून रस्त्यावरील जखमी होणाऱ्या प्राण्यांवर उपचार होणार आहेत.

खुशबू श्रीश्रीमाळ, कोमल श्रीश्रीमाळ, भवानी अग्रवाल, अनुज अग्रवाल, हर्षल भाटिया, डॉ. जय राजपूत, दीपांशू दोशी, अभिषेक जैन, तेजू आर्या, विशाल रावलानी, कल्याणी वाघ, भूमिका मंत्री आणि भैरवी जैन या तरुणांनी दीड वर्षापूर्वी मुक्या प्राण्यांसाठी प्रयत्न सुरू केले.

... आणि मिळाली लोकांसह सामाजिक संस्थांची साथ

मुक्या प्राण्यांसाठी काम करीत असताना या तरुणांनी आपल्याला लोकसहभागातून मदत मिळते का? हे पण पाहिले. त्यांच्या प्रयत्नांना काही लोकांसह सामाजिक संस्थांनी साथ दिली. अखेर त्यांनी स्वतःची साधनांनी सुसज्ज अशी ॲनिमल ॲम्ब्युलन्स आणि छोट्याशा जागेत प्राण्यांसाठी हक्काचे निवारागृहही उभारले.

मिळेल मोफत सेवा

रस्त्यावरील प्राण्यांसाठी ही ॲम्ब्युलन्स तयार केली आहे. या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून शहरात मोफत सेवा दिली जाईल. एखाद्या प्राण्याला - मग तो कुत्रा, बकरी, मांजर, गाय किंवा अन्य कोणताही प्राणी असो - त्याचा अपघात झाला किंवा काही वैद्यकीय मदत हवी असेल तर आमच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला की लगेचच ॲम्ब्युलन्स उपलब्ध होईल. संबंधित प्राण्याला तत्काळ निवारागृहात आणले जाईल, त्या ठिकाणी त्यावर उपचार होतील. ही सेवा मोफत आणि सर्वांसाठी खुली असेल, असे असोसिएशनच्या संस्थापक-अध्यक्षा खुशबू श्रीश्रीमाळ यांनी सांगितले.