स्त्री रोगावर मोफत तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:26 IST2020-12-05T04:26:19+5:302020-12-05T04:26:19+5:30

जळगाव : स्त्रीयांविषयीच्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी स्व.कौसल्याबाई भगवानदास नवाल स्मृत्यर्थ धमार्थ चिकित्सालयतर्फे २ ते ८ डिसेंबर ...

Free gynecological screening camp | स्त्री रोगावर मोफत तपासणी शिबिर

स्त्री रोगावर मोफत तपासणी शिबिर

जळगाव : स्त्रीयांविषयीच्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी स्व.कौसल्याबाई भगवानदास नवाल स्मृत्यर्थ धमार्थ चिकित्सालयतर्फे २ ते ८ डिसेंबर २०२० या तीन दिवसांसाठी स्त्री रोगावर मोफत तपासणी शिबिर आयोजित केले आहे. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत धर्मार्थ चिकित्सालय, २६/ अ, टागोर नगर येथे हे शिबिर होणार आहे. शिबिरात गरजू महिलांसाठी दुर्बिणीद्वारे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. स्त्रीयांमध्ये ओटी पोटदुखी, पाळीचे त्रास, पांढर्या पाण्याचे त्रास, गर्भाशयाच्या गाठींचे आजार आदी अनेक समस्या स्त्रीयांमध्ये निर्माण होत असतात. शहर व परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी शिबिराचा लाभ घ्यावा अथवा अधिक माहितीसाठी संपर्क साधावा असे आवाहन संचालक डॉ. सुदर्शन नवाल, डॉ. सुयश नवाल यांनी केले आहे.

Web Title: Free gynecological screening camp