शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पहूर येथे हाणामारी, चार जणांना अटक

By admin | Updated: June 19, 2017 01:13 IST

खाटीक गल्लीतील घटना : परस्परांविरुद्ध गुन्हे

पहूर : क्षुल्लक कारणावरून सहा जणांमध्ये हाणामारी झाल्याची घटना 17 रोजी रात्री घडली.  याप्रकरणी पहूर पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पैकी चार आरोपींना अटक करण्यात आली. पेठमधील खाटीक गल्लीत ही घटना  घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक कुमावत याला शे.फहीम शे.कलीम म्हणाला की, तुझा मामा रस्त्यात पडला आहे. त्याला बाजूला कर, याचे वाईट वाटल्याने दोघांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाली. त्या दरम्यान सागर बारी हा दीपकचा मित्र असल्याने त्यालाही मारहाण करून, डोके फोडून जखमी करण्यात आले. याप्रकरणी सागर लक्ष्मण बारी याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी शे.फहीम शे.कलीम, शे.रहीम शे.कलीम व त्याचा एक भाऊ  यांच्याविरुद्ध भादंवि 324, 323, 504 व 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुस:या फिर्यादीत शे.रहीम शे.कलीम यालाही आरोपी दीपक श्याम कुमावत, सागर लक्ष्मण बारी व एकनाथ सीताराम यांनी मारहाण केल्याचे शे.रहीम याने  फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून शे.फहीम शे.कलीम, शे.रहीम शे.कलीम, दीपक श्याम कुमावत, सागर लक्ष्मण बारी यांना शनिवारी मध्यरात्रीच अटक करण्यात आली. आणि रविवारी जामनेर न्यायालयात हजर केले असता त्यांची सुटका करण्यात आली आहे. या घटनेमुळे शनिवारी रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.