शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आगीत शेतातील मका जळून खाक

By admin | Updated: April 11, 2017 00:11 IST

विवरे, चांगदेव : मोठी हानी, शेतकरी अडचणीत

विवरे, ता.रावेर/चांगदेव, ता.मुक्ताईनगर : रावेर तालुक्यातील  विवरे व मुक्ताईनगर तालुक्यातील मेहूण येथे लागलेल्या आगीत मका जळून खाक झाला. यात शेतक:यांचे मोठे नुकसान झाले.चांगदेव- मेहूण येथील गोपाळ तुकाराम पाटील यांच्या एक एकर शेतातील उभ्या मक्याचे पीक शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाले. यात ठिबक संचही जळाले. यात सुमारे एक लाखाचे नुकसान झाल्याचे गोपाळ चौधरी यांनी सांगितले. ही घटना सोमवारी सकाळी 8 ते दहा वाजेच्या सुमारास घडली. गेल्या चार-पाच महिन्यांपासून डीपीवरील वायर उघडय़ा पडल्या आहेत.वीज वितरणकडे याबाबत वारंवार सांगूनही दखल घेण्यात आली नाही, असा संताप माजी सरपंच विकास पाटील यांनी ‘लोकमत’जवळ बोलताना व्यक्त केला.विवरे, ता.रावेर- विपीन विजय राणे यांच्या रावेर शिवारातील गट नं. 1015 मधील 4 हेक्टर 65 आर  मधील असलेल्या शेतात लावलेला  मका   9 रोजी लागलेल्या  अकस्मात  आगीत जळून खाक झाला. यात सुमारे 10 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी पी. एन. वानखडे कृषी अधिकारी एन. व्ही. रुले  यांनी केला.  या घटनेमुळे हवालदिल झालेले शेतकरी उपसरपंचपती विपीन राणे यांनी दि 9 रोजी दुपारी  पाहणीसाठी गेले असता त्यांना शेतात  अकस्मात लागलेल्या आगीत संपूर्ण मका खाक झाल्याचे चित्र   दिसले, त्यामुळे  त्यांना जबर धक्का बसला.  तोंडाशी आलेला घास  अकस्मात  आगीने हिसकावून नेल्यामुळे राणे कुटुंब हवालदिल झाले आहे. पीक लागवडीपासून कापणीर्पयत संपूर्ण मेहनतीवर पाणी फिरले आहे.  (वार्ताहर)