शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या डोक्याला ‘ई-पीक’ पाहणीचा ताप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून ई-पीक पाहणी कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून ई-पीक पाहणी कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेची माहितीच नाही. अनेकांनी हे ॲप डाऊनलोड केलेेले नाही. तसेच ज्यांनी डाऊनलोड केलेले आहे. त्यांना त्याचा वापर कसा करायचा, याची पुरेशी माहिती नाही. यात तलाठी प्रत्येक शेतात जाऊन पिकाचे क्षेत्र नोंदवत आहेत. तसेच हे काम शेतकरीदेखील करू शकतात.

कोट - शेतकऱ्यांनी शेताच्या मध्ये दहा मीटर अंतर जाऊन पिकांचे फोटो काढून ॲपवर अपलोड करायचे आहेत, तसेच त्यांचे क्षेत्र व इतर माहिती त्यावर भरायची आहे. ही माहिती ७/१२ उताऱ्यात पीकपेरामध्ये येईल. तसेच ही माहिती तलाठीदेखील अपलोड करू शकतात - शुभांगी भारदे, उपजिल्हाधिकारी, महसूल

गेल्या काही दिवसांपासून ‘ई-पीक’ पाहणीचा कार्यक्रम राबवला जात आहे. मात्र, त्याबाबत शेतकऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. आधीच गावातील अनेक शेतकऱ्यांकडे त्यासाठी लागणारा मोबाईल नाही. त्यामुळे याची माहिती तरी नीट देण्यात यावी.-

- रामचंद्र धनजी पाटील, शेतकरी

‘ई-पीक’ पाहणीसाठी शेतकऱ्यांना माहिती भरायची आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडे मोबाईल असणे गरजेचे आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना त्या ॲपचा उपयोग करता येणार नाही. तसेच गावस्तरावर योग्य ते प्रशिक्षण दिले गेले पाहिजे.

- अरुण लक्ष्मण पाटील, शेतकरी

कोणत्या तालुक्यात किती

तालुका नोंदणी ॲक्टिव्ह इनॲक्टिव्ह

जळगाव ५१५८ ४८७७ ३१०

भडगाव ५७४१ ५५०८ २३३

मुक्ताईनगर ३८८० ३६४५ २३५

चाळीसगाव १०३०० ९७५७ ५४३

धरणगाव ८६३० ८२७५ ३५५

बोदवड ३२२७ ३०५८ १६९

पारोळा १०१६३ ९७५५ ४०८

रावेर ८८३३ ८४५५ ३७८

भुसावळ ३७७७ ३५५६ २२१

यावल ९७४३ ८९७४ ७६९

पाचोरा १२१२१ ११६२७ ४९४

एरंडोल ६९३३ ६६७३ २६०

अमळनेर १७९६३ १७३२२ ६५१

जामनेर १७९६४ १७२५२ ७१२

चोपडा १३६२६ १३०८० ५४६

एकूण नोंदणी १३८०९८

ॲक्टिव्ह १३१८१४

इनॲक्टिव्ह ६२८४