शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शिरसोली येथे १४ व्या वित्त आयोगात भ्रष्टाचाराची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे सरपंच प्रदीप पाटील यांनी ग्रामसेवकांवर दबाव टाकून १४ व्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे सरपंच प्रदीप पाटील यांनी ग्रामसेवकांवर दबाव टाकून १४ व्या वित्त आयोगाचे प्लॅन मंजूर करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप ग्रामपंचायतींच्या ९ सदस्यांनी केला आहे. १४ व्या वित्त आयोगाची संपूर्ण रक्कम सरपंच व ग्रामसेवकांकडून वसूल करावी, अशी मागणी या सदस्यांनी केली असून त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले आहे.

१४ व्या वित्त आयोगाच्या कामाच्या निविदा काढण्यात आलेल्या नसून परस्पर ठेकेदारास काम देण्यात येत आहे. सरपंच पाटील व ग्रामसेवक शिरतूरे हे संगनमताने भ्रष्टाचार करीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. १३ मार्च रोजी झालेल्या बैठकीचे सर्व प्रोसिडिंग रद्द करण्याची मागणीही या सदस्यांनी केली आहे. आम्ही ९ सदस्यांनी ठरावास विरोध दर्शविला आहे. मात्र, ग्रामसेवक प्रोसेडिंग बूक घरी घेऊन गेले असून त्या ठिकाणी जागा कोऱ्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे यात भ्रष्टाचाराला वाव मिळतो. त्यामुळे १४ वित्त आयोगाचा काढलेला संपूर्ण पैसा हा सरपंच व ग्रामसेवकांक यांच्याकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर ग्रा.पं.सदस्य समाधान जाधव, डिगंबर बारी, प्रवीण बारी, उषा पवार, आशाबाई बारी, श्रद्धा काटोले, रुपाली नेटके, फैजिया खाटीक, शीतल खलसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रदीप पाटील यांच्याकडे बहूमत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.