शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शेताबाहेर थांबलेल्या शेतकऱ्याला डम्परने दुचाकीसह चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:17 IST

चिंचोलीजवळील घटना : उपचारादरम्यान मृत्यू फोटो.. जळगाव : शेताबाहेर दुचाकीसह उभ्या असलेल्या शिवाजी काळू पाटील (वय ६५, रा.धानवड, ...

चिंचोलीजवळील घटना : उपचारादरम्यान मृत्यू

फोटो..

जळगाव : शेताबाहेर दुचाकीसह उभ्या असलेल्या शिवाजी काळू पाटील (वय ६५, रा.धानवड, ता.जळगाव) या शेतकऱ्याला विरुद्ध दिशेने सुसाट आलेल्या डम्परने चिरडल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजता घडली. जखमी शेतकऱ्याला तत्काळ ग्रामस्थांनी जळगावी हलविले. उपचार सुरू असताना संध्याकाळीच त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, या घटनेनंतर चालकाने डम्पर सोडून पळ काढला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील धानवड येथील शिवाजी काळू पाटील हे कुटुंबीयांसह जळगाव शहरात मेहरुण परिसरात वास्तव्यास होते. बुधवारी ते धानवड येथे भावाकडे आले होते. त्यानंतर, नेहमीप्रमाणे ते शेतात गेले होते. दुपारच्या सुमारास शेताला लागून असलेल्या रस्त्यावर दुचाकीजवळ उभे असताना विरुद्ध दिशेने सुसाट येणाऱ्या डम्परने (क्र.जी.जे.१८अे.यु.७५६०) दुचाकीसह शेतकऱ्याला फरफटत शेतात नेले. यात शिवाजी पाटील गंभीर जखमी झाल्याने, तशाच अवस्थेत ट्रकवरील चालक आणि त्याचा साथीदार दोघांनी धूम ठोकली. जखमीला ग्रामस्थांनी उपचारार्थ जळगावात हलविले. उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.