शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
2
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
3
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
4
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
5
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
6
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
7
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
8
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
9
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
10
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
12
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
13
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
15
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
16
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
17
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
Daily Top 2Weekly Top 5

सहा नमुन्यांमध्ये भेसळ

By admin | Updated: February 13, 2015 15:35 IST

आठ डेअरींमधून घेतलेल्या दुधाच्या व स्किम्ड् मिल्क पावडरच्या ९ नमुन्यांबाबतचा गाझियाबाद येथील केंद्र शासनाच्या रेफरल फूड लॅबचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

जळगाव : िजल्ह्यातील आठ डेअरींमधून घेतलेल्या दुधाच्या व स्किम्ड् मिल्क पावडरच्या ९ नमुन्यांबाबतचा गाझियाबाद येथील केंद्र शासनाच्या रेफरल फूड लॅबचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार एकूण नऊ नमुन्यांपैकी सहा नमुन्यांमध्ये भेसळ(अप्रमाणित) तर तीन नमुने प्रमाणित असल्याचे आढळून आले आहे. एकही नमुना असुरक्षित असल्याचे आढळून आलेले नाही. जिल्हा दूध उत्पादक संघाच्या म्हशीच्या दुधाचा नमुनाही अप्रमाणित असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
नऊ पैकी कोणत्या डेअरींचे सहा नमुने अप्रमाणित आढळून आले, याबाबतची विचारणा अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त बी.यु. पाटील यांना केली असता, मी बाहेरगावी आहे, नावे सांगू शकत नसल्याचे ते म्हणाले. 
अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई येथील दक्षता पथकाने १८ व १९ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील १६ डेअरींवर धाडी टाकल्या होत्या. यामध्ये ३ लाख ५९ हजार ९४0 रुपये किमतीचे ११ हजार ९९८ लीटर दूध आणि १0 लाख ८५ हजार ३७0 रुपये किमतीची ३ हजार ७५७ किलो स्कीम्ड मिल्क पावडर जप्त करण्यात आली होती. धाडीमध्ये पथकांनी गायीचे-म्हशीचे दूध, प्रमाणित दूध,मिक्स मिल्क, स्कीम्ड मिल्क पावडर, टोन मिल्क आदींचे २६ नमुने घेतले होते.
हे नमुने मुंबईच्या अन्न विश्लेषक,अन्न चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्हा सहकारी दूध संघासह शीतल डेअरी (पारोळा), ममता डेअरी (चाळीसगाव),मंगलमूर्ती डेअरी (चाळीसगाव), सुशील डेअरी (भडगाव), अपेक्षा डेअरी (चाळीसगाव), गणेश दर्शन डेअरी गणेश (चाळीसगाव) आणि सर्मथ डेअरी, भडगाव या आठ डेअरींच्या दुधामध्ये साखर, मिल्क पॅट, स्किम्ड मिल्क पावडर आढळून आली होती. 
हे दूध अन्न सुरक्षा मानके कायद्यातील तरतुदीनुसार असुरक्षित असल्याचे मत अन्न विश्लेषकांनी व्यक्त केले होते. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने या सर्व डेअरींविरुध्द त्यांच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

----------

मुंबईच्या अन्न विश्लेषक,अन्न चाचणी प्रयोगशाळेचा अहवालात नमुने अप्रमाणित असल्याचा अहवाल आल्यानंतर डेअरीचालकांनी पुनर्तपासणी करण्याचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केले होते. अन्न व औषध प्रशासनाने या डेअरींचे ९ नमुने गाजियाबादच्या रेफरल लॅबला पाठविले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. नऊपैकी एकही नमुना असुरक्षित आढळून आलेला नाही. जर असुरक्षित आला असता तर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असता.