शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

अहकांराचा वारा न लागो राजसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 23:26 IST

वैदिक परंपरेनुसार सर्व भारतात दसरा हा सण साजरा केला जातो. अध्यात्मिक भाषेत सांगावयाचे झाले तर, रावणाचा वध किंवा रावण ...

वैदिक परंपरेनुसार सर्व भारतात दसरा हा सण साजरा केला जातो. अध्यात्मिक भाषेत सांगावयाचे झाले तर, रावणाचा वध किंवा रावण दहन याचा अर्थ अहंकारावर विजय मिळवणे, असा होतो. वारकरी संतांनी म्हटले आहे, अभिमान असावा मात्र अहंकार नसावा. स्वत:च्या कर्माचा अभिमान जरूर असावा मात्र अहंकार नसावा. अभिमान व अहंकार यांच्यातला फरक संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या ९व्या अध्यायात अत्यंत सुंदर पध्दतीने मांडला आहे. अभिमान म्हणजे, ‘काम मी करू शकतो आणि अहंकार म्हणजे ‘काम मीच करू शकतो..’ अभिमान आणि अहंकार यातला फरक म्हणजे ‘मी आणि मीच’ याला फरक आहे.यासाठीच संत नामदेवांनी देवाला मागणे मागितले आहे.अहंकाराचा वारा न लागो राजसा। माझिया विष्णूदासा भाविकांसी। संत नामदेव।।. संत नामदेवांनी मागताना म्हटले, अहंकार तर सोडा, अहंकाराचा वारादेखील माझ्या वैष्णव-वारकऱ्यांना लागू नये! अहंकारामुळे माणसाने पतन होते, हे गीतेत भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे आणि अहंकार फक्त साधू संतांच्या संगतीनेच जातो आणि म्हणूनच संत तुकाराम म्हणतात, दसरा दिवाळी तोचि आम्हा सण।सखे संतजन भेटतील।संत तुकाराम।। अहंकार रुपी शत्रूवर विजय मिळवूया! व जीवन सुखमय-आनंदमय करू या!!-डॉ. कैलास पाटील, पिपळेसीम, ता. धरणगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव