आठवडाभरात मिळणार जिल्हा शल्यचिकित्सक

By Admin | Updated: June 21, 2014 16:17 IST2014-06-21T16:17:46+5:302014-06-21T16:17:46+5:30

राज्याचे आरोग्य संचालक डॉ.सतीश पवार यांनी आठवडाभरात जळगाव जिल्ह्यासाठी नवीन जिल्हा शल्यचिकित्सकांची नियुक्ती करण्यात येईल असे सांगितले.

District Surgeon will get it within a week | आठवडाभरात मिळणार जिल्हा शल्यचिकित्सक

आठवडाभरात मिळणार जिल्हा शल्यचिकित्सक

जळगाव : जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास राज्याचे आरोग्य संचालक डॉ.सतीश पवार यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आठवडाभरात जळगाव जिल्ह्यासाठी नवीन जिल्हा शल्यचिकित्सकांची नियुक्ती करण्यात येईल असे सांगितले.

आरोग्य संचालक डॉ.सतीश पवार यांचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार, डॉ.राजकुमार सूर्यवंशी यांनी स्वागत केले. यावेळी डॉ.सतीश पवार यांनी नवीन इमारतीतील महिला वॉर्ड, फार्मसी विभाग, सीटी स्कॅन विभागाची पाहणी केली. 
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सही झाली असून आठवडाभरात नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. औषधीचा साठा या ठिकाणी मुबलक असल्याचे त्यांनी सांगितले. सीटी स्कॅन मशीन संदर्भात विप्रो कंपनीसोबत करार झाला असून काही दिवसात ही सुविधा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी २ ते ८ जुलै दरम्यान मुंबई येथे कौन्सिलींग परिषद होत आहे. 
या परिषदेत राज्यभरातील अनेक डॉक्टरांचा सहभाग असणार आहे. यावेळी काही वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मुलाखती घेऊन जळगावसाठी इच्छुक असलेल्या डॉक्टरांना नियुक्ती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांना काही सूचना दिल्या. जिल्हा रुग्णालयातील पाहणीनंतर ते रवाना झाले.

Web Title: District Surgeon will get it within a week