बहादरपूर येथे जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 23:30 IST2019-09-22T23:30:46+5:302019-09-22T23:30:57+5:30

पारोळा : आप्पासाहेब गोविंदराव बोरसे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बहादरपूर येथील रा.का.मिश्र वरिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय वाद-विवाद स्पर्धा झाली. रा.का. मिश्र वरिष्ठ ...

District level debate competition in Bahadurpur | बहादरपूर येथे जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धा

बहादरपूर येथे जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धा



पारोळा : आप्पासाहेब गोविंदराव बोरसे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बहादरपूर येथील रा.का.मिश्र वरिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय वाद-विवाद स्पर्धा झाली. रा.का. मिश्र वरिष्ठ महाविद्यालय व बोरसे परिवार यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.
नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेशचंद्र वैद्य अध्यक्षस्थानी होते. सोशल मीडियाचा समाज जीवनावर पडणारा प्रभाव- हितकारक की अहितकारक या विषयावर स्पर्धकांनी वक्तृत्व केले. यात प्रथम पुरस्कार भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयाची अंजली संग्राम पाटील, द्वितीय जळगावच्या मुळाजी जेठा महाविद्यालयाची प्रगती मदनराव जांभूळकर तर तृतीय पारितोषिक अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचा निलेश संजय बागुल यांना देण्यात आले.

Web Title: District level debate competition in Bahadurpur