जिल्हा बँकेचा 'एनपीए' होणार कमी

By Admin | Updated: June 17, 2014 08:40 IST2014-06-17T08:40:33+5:302014-06-17T08:40:33+5:30

वसंत सहकारी साखर कारखान्यावर अवसायक म्हणून जिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आल्याने कामगारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत तसेच अवसायकामुळे आता जिल्हा बँकेचा तोटाही (एनपीए) वाढणार नाही.

District Bank's 'NPA' will be reduced | जिल्हा बँकेचा 'एनपीए' होणार कमी

जिल्हा बँकेचा 'एनपीए' होणार कमी

>जळगाव : एरंडोल तालुक्यातील वनकोठे येथील वसंत सहकारी साखर कारखान्यावर अवसायक म्हणून जिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आल्याने कामगारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत तसेच अवसायकामुळे आता जिल्हा बँकेचा तोटाही (एनपीए) वाढणार नाही.
पुणे येथील साखर आयुक्त विजय सिंघल यांनी 'वसाका'वर जिल्हाधिकार्‍यांची अवसायक म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे कारखान्याची थकीत वसुली करून ती संबंधिताना वितरीत करावी लागणार आहे. ही मोठी जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांना कितपत पेलविते हे काही दिवसात स्पष्ट होईल. आतापर्यंत ही जबाबदारी जिल्हा बँकेची होती. कारण सिक्युरिटायझेशन अँक्ट अन्वये हा कारखाना बँकेच्या ताब्यात आहे.
हा कारखाना विक्री करण्यास सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा बँकेला यापूर्वीच परवानगी दिली आहे. मात्र विक्रीनंतर प्राप्त होणारी रक्कम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये वितरित करावी लागणार आहे. कामगारांच्या देणीबाबतचा वादही सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. त्यामुळे वसाकाचा गुंता वाढला आहे. 
अवसायकामुळे मालकी हक्कात मात्र कोणताही बदल होणार नाही. सिक्युरिटायझेशन अँक्ट अन्वये कारखाना बँकेच्या ताब्यातच राहणार असल्याचे जिल्हा बँकेचे चेअरमन चिमणराव पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
 
जिल्हा बँकेचा 'एनपीए' होणार कमी
अवसायकाच्या नियुक्तीमुळे कारखान्याकडून बँकेला आता व्याज आकारता येणार नाही. व्याजामुळे जिल्हा बँकेचा एनपीए विनाकारण फुगत होता. आता ही अडचण सुद्धा दूर होणार आहे. 

Web Title: District Bank's 'NPA' will be reduced