शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेटअभावी शिरसोली येथे जिल्हा बँकेचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:13 IST

शिरसोली : जिल्हा बँकेच्या शिरसोली शाखेमध्ये गेल्या चार दिवसांपासून इंटरनेट बंद असल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे बँक ग्राहकांना ...

शिरसोली : जिल्हा बँकेच्या शिरसोली शाखेमध्ये गेल्या चार दिवसांपासून इंटरनेट बंद असल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे बँक ग्राहकांना वारंवार चकरा माराव्या लागत असून, शेतकऱ्यांसह ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शिरसोली प्र.बो. येथे असलेल्या या बँकेत बहुतांश शेतकरी, सरकारी नोकर, ग्रामपंचायत व सामान्य ग्राहक मोठ्या प्रमाणावर आहेत; परंतु गेल्या चार ते पाच दिवसांपासून बँकेचे नेट बंद असल्याने व्यवहार ठप्प आहेत. काही ग्राहकांना तत्काळ‌ पैशांची गरज भासल्यास बँकेतील कर्मचारी जळगाव येथील मुख्य शाखेत संपर्क साधून ग्राहकाच्या खात्याची चौकशी करून व्यवहार पूर्ण करीत आहे. यात बराच वेळ वाया जात असल्याने ग्राहक कंटाळून घरी निघून जातात.

पावसाळा तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना जमीन मशागत, बी-बियाणे व इतर कामांसाठी विविध कार्यकारी सोसायटीमार्फत पीक कर्ज मिळत असते. हे सर्व व्यवहार जिल्हा बँकेशीच निगडित असल्याने शेतकरी वर्गाचे चांगलेच हाल होत आहेत. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील नेटची समस्या त्वरित मार्गी लावून व्यवहार सुरळीत करावेत, अशी मागणी होत आहे.