शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतून घरी परतणाऱ्या बलिकेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 20:42 IST

नाडगाव येथील प्रकार : वडिलांनाही मारहाण

बोदवड : तालुक्यातील नाडगाव येथील शाळेत शिक्षण घेत असलेली इयत्ता नववीतील बालिका शाळा सुटल्यानंतर नाडगाव येथे घरी जात असताना बोदवड रेल्वेगेट जवळ नाडगाव येथीलच शासकीय ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेला विशाल अर्जुन माळी रा. येवती याने विनयभंग केला. पोलीस स्टेशनला हे प्रकरण आले असताना जाब विचाणाºया मुलीच्य वडिलांना आरोपीच्या मित्रांनी धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकारही घडला.या संदर्भात प्राप्त माहिती अशी की, नाडगाव येथील अल्पवयीन युवती नेहमी प्रमाणे सकाळी शाळेत गेली होती. दुपारी १२ वाजेच्या सुमारास ती शाळेकडून घराकडे परतत असताना विशाल माळी याने तिला अडवून मी तुझ्यावर प्रेम करतो, असे म्हणत तु माझ्यावर प्रेम कर नाहीतर अ‍ॅसिड टाकून तुला जाळून टाकेल असे धमकावले. भेदरलेल्या स्थितीत या मुलीने घराकडे धाव घेतली व झालेला प्रकार पालकांना सांगितला. तिच्या पालकांनी ताबडतोब पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली. पोलिसांनी या मुलाला पकडून पोलीस स्टेशनला आणले असता त्याच्या बरोबर त्याचे तीन मित्रही आले. मुलीचे पालक आरोपीस जाब विचारत असताना त्याच्या मित्रांनी त्यांना धक्काबुक्की व मारहाण केली.याप्रकरणी मुलीच्या फियार्दी वरून आरोपी तरुण व त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पुढील तपास उपनिरीक्षक मालचे करीत आहेत.