शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बाह्य रुग्ण कक्ष बंद करण्याची चर्चा दुर्देवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 9:07 PM

नाना महाजन : उपस्थित न राहणा-या कर्मचा-यांवर कारवाई करा

जळगाव : जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत जि.प.मुख्यालयात सुरु करण्यात आलेले बाह्य रुग्ण कक्ष बंद करण्यावर चर्चा करण्यात आली. भाजपचे जि.प.सदस्य अमित देशमुख यांनी तीन कर्मचाऱ्यांची बाह्य रुग्ण कक्षासाठी नियुक्ती करण्यात आलेली असताना प्रत्यक्षात कक्षात एकच कर्मचारी उपस्थित राहत असल्याने हे बाह्य रुग्ण कक्ष बंद करण्याची मागणी केली होती. यावर समितीच्या बैठकीत बाह्य रुग्ण कक्ष बंद करण्यावर चर्चा झाली. दरम्यान शिवसेनेचे जि.प.सदस्य नाना महाजन यांनी बाह्य रुग्ण कक्ष बंद करण्याची चर्चा दुर्दैवी असल्याचे आरोप केला आहे.दरम्यान, नियुक्त केलेले कर्मचारी उपस्थित राहत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊन दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, मात्र हे बाह्य रुग्ण कक्ष बंद करू नये अशी मागणीही त्यांनी केली. कर्मचारी उपस्थित राहत नाही, त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकारी समितीला आहे. मात्र समिती नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करता ओपीडी बंद करण्यास का हतबल आहे? असा सवालही नानामहाजन यांनी उपस्थित केला आहे.डॉक्टर दाखवा हजार रुपये मिळवाओपीडीसाठी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.अभिषेक ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ते याठिकाणी हजर नसतात, त्यांच्याकडून अतिरिक्त काम होत नसेल तर त्यांनी ती जबाबदारीदुसऱ्याकडे द्यावी असे सांगत वैद्यकीय अधिकारी दाखवा आणि हजार रुपये मिळावा असे आव्हान नाना महाजन यांनी दिले आहे. 'माझ्याकडे फैजपूर आरोग्य केंद्राचा अतिरिक्त कार्यभार असल्याने आपण काही दिवस तिकडे तर काही दिवस जिल्हा परिषदेतील बाह्य रुग्ण विभागात कार्यरत असतो, त्यामुळे ओपीडीत डॉक्टर नसल्याचा मुद्दा हा गैरसमजाने मांडला गेला असावा, असे स्पष्टीकरण वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक ठाकूर यांनी दिले आहे.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव