शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अपंगत्व तपासणी ३१ मार्चपर्यत स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 20:55 IST

जळगाव - कोरोना विषाणू संसर्गाचा जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रतिबंधात्मक ...

जळगाव- कोरोना विषाणू संसर्गाचा जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात दर बुधवारी अपंगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता ही तपासणी ३१ मार्च पर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी घेतला आहे.कोरोना विषाणू संसगार्बाबत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचेशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून आढावा घेतला. या आढाव्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सर्व संबंधित यंत्रणेची बैठक घेऊन उपस्थितांनाुसूचना केल्यात. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ किरण पाटील यांचेसह जिल्हा परिषद, महानगरपालिका व आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये याकरीता जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहे. तथापि, जगभरात या विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता अधिक प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची गरज असल्याने गर्दी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे. अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दर बुधवारी नागरीकांची तपासणी करण्यात येते. यासाठी जिल्हाभरातील ग्रामीण भागातून नागरीक येत असतात. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयातही नागरीक आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी येतात. परंतु कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठी आता नागरीकांना कार्यालयात येण्याची गरज नसून ते त्यांच्या अडचणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या मेलवर पाठवू शकतील. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरीकांच्या अडचणींना त्यांच्या मेलवरच उत्तर देण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सांगितले. तसेच जिल्हा परिषद व महापालिकेनेही हीच पध्दत अवलंबण्याची सूचना त्यांनी बैठकीत दिली. त्याचबरोबर नागरीकांनी तूर्तास धार्मिक व पर्यटरस्थळांना जाणे टाळावे. असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव