शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांक शुल्क सवलतीमुळे दस्त नोंदणी ६५ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासनाने जाहीर केलेल्या मुद्रांक सवलत योजनेचा जळगाव जिल्ह्यातील ६४ हजार ४३ नागरिकांनी लाभ घेतला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासनाने जाहीर केलेल्या मुद्रांक सवलत योजनेचा जळगाव जिल्ह्यातील ६४ हजार ४३ नागरिकांनी लाभ घेतला असून यातून फेब्रुवारी महिना अखेर ११० कोटी ९० लाख रुपयांचा मुद्रांक महसूल जमा झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा या काळातील नोंदणीमध्ये ६५.५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या वर्षापासून कोरोनाचे संकट ओढावल्याने सर्वच क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम झाला. यात बांधकाम क्षेत्रही सुटले नाही. मात्र कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागताच सर्व व्यवहार सुरळीत होत असताना घरांनाही मागणी वाढली. यात बांधकाम क्षेत्राला चालना मिळावी यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कमध्ये सवलत जाहीर केली.

दोन टप्प्यात ही योजना जाहीर झाली. १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत शासनाने तीन टक्के मुद्रांक शुल्क सवलत योजना जाहीर केली होती. तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ पर्यंत दोन टक्‍क्‍यांची सवलत होती. या दोन्ही टप्प्यात जळगाव जिल्ह्यात ६४ हजार ४३ दस्तांची नोंदणी झाली आहे. पहिल्या टप्प्यात सप्टेंबर ते डिसेंबर २०२० अखेर ३५,५३१ दस्तांची नोंदणी होऊन ७६.९५ कोटी मुद्रांक महसूल वसूल झाला. त्यानंतर १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२१ अखेर ३३ कोटी ९५ लाख असा दोन टप्प्यात एकूण ११० कोटी ९० लाख मुद्रांक महसूल वसूल झाला. यामध्ये १ मार्च ते ३१मार्च २०२१ या कालावधीतील मुद्रांक महसुलाची रक्कम वेगळी राहणार आहे, ती अद्याप उपलब्ध झालेली नाही. १ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान २८ हजार ५१२ दस्तांची नोंदणी झाली आहे.

लॉकडाऊनमुळे गेल्यावर्षी जूननंतर दस्त नोंदणीला प्रतिसाद मिळू लागला. त्यानंतर शासनाने तीन टक्के मुद्रांक सवलतीची योजना जाहीर केली. त्यामुळे सप्टेंबरपासून दस्त नोंदणीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला.

दस्त नोंदींची दोन वर्षातील तुलना

महिना---२०१९-२०---२०२०-२१

सप्टेंबर ---४७९२---६९४७

ऑक्टोबर---४३५९---६८४४

नोव्हेंबर---६२९२---८००४

डिसेंबर ---६२९२---१३७३६

जानेवारी ---७४१०---९१४६

फेब्रुवारी---६७२६---९५०५

मार्च---५६४१---९८६१