शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षेचे धडे देणाऱ्या आरटीओंच्या दारातच बेशिस्तीचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:56 IST

जळगाव : ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान...स्वत: मात्र,..’अशी परिस्थिती सध्या आरटीओ कार्यालयाची झाली आहे. रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाच्या निमित्ताने वाहनधारक व ...

जळगाव : ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान...स्वत: मात्र,..’अशी परिस्थिती सध्या आरटीओ कार्यालयाची झाली आहे. रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाच्या निमित्ताने वाहनधारक व जनतेला शिस्तीचे धडे देत असलेल्या आरटीओ कार्यालयाच्या आत व बाहेर बेशिस्तीचे प्रदर्शन घडत आहे. ठिकठिकाणी एजंटांची थाटलेले दुकाने व त्यांच्या भोवती ग्राहकांचा विळखा यात कार्यालयच हरविल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे आरटीओ अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत बेशिस्तपणे वाहने पार्कींग केली जात असल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणी दरम्यान आढळून आले.

आरटीओ कार्यालयाच्यावतीने सध्या रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबविले जात आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांच्या उपस्थित या अभियानाचे उद‌्घाटन गेल्या आठवड्यात झाले. यावेळी वाहनधारकांनी वाहन चालविताना अपघात टाळण्यासाठी काय काळजी, खबरदारी घ्यावी, हॉर्न, सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, सीटबेल्ट व हेल्मेटचा वापर यासह इतर विषयांवर प्रबोधन करण्यात आले. मात्र हे उपदेशाचे डोस पाजत असतानाच आपल्याच दाराशी काय अवस्था आहे, याचा मात्र आरटीओच्या अधिकाऱ्यांना विसर पडल्याचे दिसून आले. स्वत: किंवा कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून देखील नियमांचे पालन होताना दिसत नाही.

रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी बेशिस्त पार्कींग

आरटीओ कार्यालयात प्रवेश करण्याच्या आधीच बेशिस्त पार्कींगचे प्रदर्शन घडते. काव्यरत्नावली चौक व डी मार्ट या दोन्ही बाजुंनी येणाऱ्या रस्त्याला लागूनच एजंटांनी दुकाने थाटली असून त्यांची स्वत:ची तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांकडून रस्त्याला लागूनच वाहन पार्कींग केली जात आहे. अगदी मुख्य प्रवेशद्वाराला देखील विळखा घालण्यात आलेला आहे. रस्त्यावरुन वापरणाऱ्या वाहनधारकांना हा रस्ता येथे मोकळा दिसतच नाही. याही पुढे जावून कार्यालयाच्या आवारात देखील शिकाऊ परवाना काढण्याच्या खोलीबाहेर, परवाना चाचणी देतानाची जागा व मुख्य इमारतीत अधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेर देखील बेशिस्तपणे वाहन पार्कींग केलेली दिसून आली.

एजंटबाबत पक्षपाती धोरण

कार्यालयाच्या आवारात एकही एजंट नको म्हणून तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी सर्व एजंटांना बाहेर काढले होते. बाहेर व्यवसाय करताना रहदारीस अडथळा होणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबत तंबीही त्यांनी दिली होती. जोपर्यंत पाटील कार्यरत होते, तोपर्यंत एजंटांनाही शिस्त लागली होती. आता मात्र तोंडे बघून भूमिका घेतली जात आहे. काही एजंट आवाराच्या बाहेर तर काही एजंट तर थेट आवारात व इमारतीतच दिसून येतात, त्यामुळे त्यांचीही वाहने आतमध्येच पार्कींग केली जातात. पक्षपाती धोरणाबाबतही नाराजीचा सूर उमटत आहे.