शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
2
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
3
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
4
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
5
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
6
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
7
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
8
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
9
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
10
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
11
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
12
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
13
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
14
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
15
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
16
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
17
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
18
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
19
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
20
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ४ बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील ४ कोरोना बाधितांचा मंगळवारी मृत्यू झाला असून शहरातील मृतांची संख्या ५६२ वर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील ४ कोरोना बाधितांचा मंगळवारी मृत्यू झाला असून शहरातील मृतांची संख्या ५६२ वर पोहोचली आहे. नवे ३३ रुग्ण आढळून आले असून ४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोराेनाचा आलेख घसरत असता मृत्यूची संख्या मात्र, दिवसभरात वाढली आहे. अन्य तालुक्यांच्या तुलनेत चाळीसगाव तालुक्यात रुग्णसंख्या वाढली असून या ठिकाणी सर्वाधिक ८६० सक्रिय रुग्ण आहेत.

शहरातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. संसर्गाचे प्रमाण झपाट्याने घसरत असून नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिकच आहेत. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ५५६ वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आरटीपीसीआर चाचण्यांमधील पॉझिटिव्हिटी ही घटली आहे. मंगळवारी १८७२ अहवाल समोर आले असून त्यात ८९ बाधित रुग्ण समोर आले हे प्रमाण ४.७५ टक्के असून ॲन्टीजनच्या ४८३० चाचण्या झाल्या आहेत यात २०२ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. हे प्रमाण ४.१८ टक्के आहे. एकत्रित बाधितांचे प्रमाण हे ४.३४ टक्के आहे. याचा अर्थ संसर्गाचे प्रमाण हे घटले आहे. आधी शंभर अहवालांमध्ये १६ लोक बाधित आढळून येत होते. तेच आता ४ ते ५ लाेक बाधित आढळून येत आहेत. मात्र, कोरोनाच्या नियमांमध्ये नागरिकांनी कुठलाही निष्काळजीपणा करता कामा नये, असा इशाराही दुसरीकडे डॉक्टरांकडून दिला जात आहे.

५०० ने घट

सक्रिय रुग्णांमध्ये एकाच दिवसात ५२२ ने घट झाली आहे. नवे रुग्ण व बरे होणारे रुग्ण यात तब्बल ५१४ चे अंतर असून हा दुसऱ्या लाटेतील उच्चांक मानला जात आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या आता ६६८७ वर आली असून यातील १३०० रुग्णांना विविध लक्षणे असून त्यापैकी ७०० रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत आहे. तर ३८३ रुग्ण हे अतिदक्षता विभागात दाखल आहेत.