शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जमावबंदी पायदळी, बाजारपेठेत गर्दीच गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:12 IST

अमळनेर : दुपारी चारनंतर संचारबंदी आदेशाच्या अंमलबजावणीत शहरात ‘कही पे बंद कही पे शुरू’ असा संमिश्र प्रतिसाद आढळून आला. ...

अमळनेर : दुपारी चारनंतर संचारबंदी आदेशाच्या अंमलबजावणीत शहरात ‘कही पे बंद कही पे शुरू’ असा संमिश्र प्रतिसाद आढळून आला. रविवारी निर्बंधाचा पहिला दिवस होता, तर दुपारी ४ नंतर सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाचा सोमवार हा पहिला दिवस होता. सोमवारी बाजारपेठेत दुपारी ४ नंतरही गर्दी होती. काही दुकाने बंद, तर काही दुकाने उघडी, अशी स्थिती सोमवारी दुपारी ४ नंतर दिसून आली.

डेल्टा प्लसचे रुग्ण जिल्ह्यात आढळल्यानंतर पुनश्च निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र रविवारी विक्रेते आणि नागरिकांनी आदेश झुगारून लावले होते. प्रशासनाने पहिला दिवस म्हणून दुर्लक्ष केले. मात्र सोमवारी ४ वाजता दुकाने बंद झाली पाहिजे होती. परंतु पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख राध्येश्याम अग्रवाल आणि पोलीस पथकाने दुपारी ४ वाजता दुकाने बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्स, भाजीपाला मार्केट, कुंटे रोड आदी ठिकाणी व्यापाऱ्यांनी हळूहळू दुकाने बंद करायला सुरुवात केली.

बाजार समितीच्या व्यापारी संकुलात सर्वच दुकाने बिनधास्त उघडी होती. सुभाष चौक, झामी चौक परिसरात काही दुकाने बंद तर काही सुरू होती. मात्र ५ वाजेनंतर जोरदार पावसाने सुरुवात केल्याने बाजारातून ग्राहक आपोआपच गायब झाले होते. भेळ, हॉटेल, फाइल विक्रेते तसेच चहाची दुकाने उघडी होती.

हातगाडी विक्रेते, किरकोळ व्यापाऱ्यांची दुकाने राजरोस उघडी

तरीदेखील हातगाडी चालक, किरकोळ विक्रेते राजरोसपणे काही विनामास्क व्यवहार करत होते. सिंधी बाजारात नावाला अर्धवट दुकाने बंद ठेवली होती. भागवत रोड परिसरात दुकाने सुरूच होती. बसस्थानक परिसरात देखील दुकाने सुरू होती.

जमावबंदीचे आदेश पायदळी

जमावबंदीच्या आदेशाचे मात्र पालन झालेले दिसून आले नाही. नागरिक सर्वत्र गर्दी करून होते, तर अनेक नागरिक विनामास्क फिरत होते.

===Photopath===

280621\28jal_11_28062021_12.jpg~280621\28jal_12_28062021_12.jpg~280621\28jal_13_28062021_12.jpg

===Caption===

अमळनेर शहरात सोमवारी चार वाजेनन्तर ‘ कही पे बंद, कही पे शुरू’ अशी स्थिती आढळून आली. पालिका कर्मचारी व पोलीस बंदचे आवाहन करीत होते. (छाया : अंबिका फोटो)~अमळनेर शहरात सोमवारी चार वाजेनन्तर ‘ कही पे बंद, कही पे शुरू’ अशी स्थिती आढळून आली. पालिका कर्मचारी व पोलीस बंदचे आवाहन करीत होते. (छाया : अंबिका फोटो)~अमळनेर शहरात सोमवारी चार वाजेनन्तर ‘ कही पे बंद, कही पे शुरू’ अशी स्थिती आढळून आली. पालिका कर्मचारी व पोलीस बंदचे आवाहन करीत होते. (छाया : अंबिका फोटो)