शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 19:19 IST

जळगाव दूध संघ : अतिवृष्टीने नुकसान झाल्याने घेतला निर्णय

जळगाव/दापोरा : अतिवृष्टीमुळे खराब झलेला चारा, बाजारातील सरकी ढेप व पशुखाद्याचे वाढलेले भाव लक्षात घेऊन दूध उत्पादकांचे नुकसान लक्षात घेता जळगावदूध संघाने गाय दूध खरेदी दरात वाढ करून ते २७ रुपयांवरून २९ रुपये प्रतिलिटर याप्रमाणे करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ११ नोव्हेंबरपासून हे नवे दर लागूहोतील.सर्व संस्थांनी व दूध उत्पादकांनी दुधाचा पुरवठा संघास करावा. अतिवृष्टीमुळे बुरशीयुक्त काळा झालेला चारा जनावरांना खावू घालणे शक्यतो टाळावे किंवा हा चारा उन्हत ३-४ दिवस वाळून त्यावर चुन्याची निवळी टाकावी व तसा प्रक्रिया केलेला चारा कमी प्रमाणात जनावरांना खाऊ घालावा.हिरव्या चाऱ्याकरिता संघामार्फत मका बियाणे दूध उत्पादकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.तसेच संघामार्फत १०० टक्के अनुदानाने राबवण्यात येणारा जंतनिर्मूलन व लसीकरणारच्या कार्यक्रमाचा दूध उत्पादकांनी संस्थेच्या माध्यमातून लाभ घ्यावा, असे आवाहन जळगाव दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांच्यावतीने करण्यात आले आहे.नवीन दर होणार लागू : म्हैस दूध खरेदी पूर्वीप्रमाणेच-जिल्हा दूध संघाकडून नवीन गाय दूध खरेदी दर हे ११ तारखेपासून २४१.७० प्रती किलो घनघटक प्रमाणे लागू होणार आहेत. त्यात ३.२ फॅट व ८.५ एसएनएफ साठी २८.१० रु तर ५.५ फॅट व ८.५ एसएनएफ ला ३३.६०रु भाव मिळेल ९ एसएनएफ पर्यन्त प्रती एसएनएफ १० पैसे अधिकचा दर दिला जाणार आहे. निकृष्ट चारा व सततचा पाऊस यामुळे दुधातील गुणवत्ता कमी झाल्याने एसएनएफ कमी लागून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे यामुळे ८.१ एसएनएफ साठी देखील उत्तम प्रतीचा दर दिला जाणार आहे._-जिल्हा दूध संघाकडून म्हैस दूध खरेदी दरात कोणतीही वाढ न करता पूर्वीप्रमाणेच ६.१० रु प्रती फॅट प्रमाणे आहेत मात्र या भाव वाढीने गाय दूध उत्पाद्कांना दिलासा मिळाला असला तरी म्हैस दूध खरेदी दर देखील वाढणे अपेक्षित होते.

टॅग्स :milkदूधJalgaonजळगाव