कापूस खरेदी केंद्राबाहेर कापसाची चोरी, पोलिसांनी काही तासातच लावला छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 13:36 IST2020-12-07T13:35:20+5:302020-12-07T13:36:22+5:30

पाचोरा शहरात सुरु असलेल्या सीसीआय कापूस खरेदी केंद्राबाहेर कापूस भरून ठेवलेले वाहन चोरीला गेले.

Cotton theft outside the cotton shopping center | कापूस खरेदी केंद्राबाहेर कापसाची चोरी, पोलिसांनी काही तासातच लावला छडा

कापूस खरेदी केंद्राबाहेर कापसाची चोरी, पोलिसांनी काही तासातच लावला छडा

ठळक मुद्देकाही तासातच पोलिसांनी लावला वाहनाचा छडा

पाचोरा : शहरातील सीसीआय कापूस खरेदी केंद्राबाहेर कापूस भरून उभे करून ठेवलेले वाहन कापसासह चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली. मात्र पोलिस प्रशासनाने तातडीने फिल्डींग लावून कापूस आणि वाहन दोन्हींचा छडा लावला.

पाचोरा शहरात सीसीआय कापूस खरेदी केंद्र उघडण्यात आले असून त्याठिकाणी कापूस घेऊन अनेक शेतकरी वाहन घेऊन येतात. या केंद्राबाहेर कापूस भरून ठेवलेले एक वाहन सोमवारी चोरीला गेले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. भडगाव तालुक्यातील गिरड येथील शेतकऱ्याचे हे वाहन असल्याचे समजते.

दरम्यान, याबाबत पोलिसांना माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली आणि काही तासातच कापूस आिण चोरीला गेलेले वाहन ताब्यात घेतले. तारखेडा रस्त्यावर पोलिसांनी ही कारवाई केली.

Web Title: Cotton theft outside the cotton shopping center