शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओला कोरोनाचा ४० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:16 IST

महसुलात घट : १४४ कोटींचे होते उद्दिष्ट जळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग प्रत्येक क्षेत्रात धोकेदायक ठरू लागला आहे. उद्योग ...

महसुलात घट : १४४ कोटींचे होते उद्दिष्ट

जळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग प्रत्येक क्षेत्रात धोकेदायक ठरू लागला आहे. उद्योग -व्यवसायावरही मोठा परिणाम होऊ लागला आहे. इतकेच काय शासनाला येणारा महसूल थांबला असून, खर्च अधिक वाढलेला आहे. शासनाला महसूल मिळवून देणाऱ्या मोठ्या विभागांमध्ये आरटीओचा समावेश होतो. एकट्या जळगाव जिल्ह्यात यंदा या विभागाला कोरोनामुळे ४० कोटींचा फटका बसला आहे.

सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात जळगाव आरटीओला १४४ कोटी ५३ लाख रुपयांचे महसुलीचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले होते. प्रत्यक्षात १०४ कोटी ८३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. ३९ कोटी ७० लाख रुपयांचा महसूल यंदा कमी मिळाला आहे. गेल्यावर्षी मार्च, एप्रिलपासूनच कोरोनाने शिरकाव केल्यामुळे सर्वत्र लाॅकडाऊन जाहीर झाला होता. यामुळे उद्योगधंदे व व्यवसाय बंद होते. सरकारी कार्यालयांतदेखील नगण्य उपस्थिती होती. वाहन उत्पादक कंपन्याही मोठ्या संख्येने बंद होत्या. त्याचा परिणाम हा प्रत्येक विभागाच्या महसुलावर तसेच रोजगारावर झालेला आहे.

आरटीओला वाहन खरेदी, नोंदणी, रोड टॅक्स व विविध प्रकारच्या कारवाईतून महसूल प्राप्त होतो. गेल्या आर्थिक वर्षात सर्वच प्रकारच्या कारवाया व वाहनांच्या नोंदणीत घट झालेली आहे.

*रोड टॅक्समधून मिळाले ८५ कोटी*

कोणतेही वाहन रस्त्यावर येण्यापूर्वी त्याची आरटीओ कार्यालयात नोंदणी होते त्याच वेळी या वाहन मालकाकडून रोड टॅक्स आकारला जातो अशा प्रकारच्या रोड टॅक्सच्या स्वरूपात आरटीओ विभागाला ८५ कोटी १२ लाख ३२ हजार २४५ रुपये एकरकमी मिळाले आहेत. त्याशिवाय ओव्हरलोड वाहनांच्या कारवाईतून १ कोटी ८५ लाख ५ हजार ४५० रुपयांचा महसूल मिळाला आहे. ५३८ वाहनांवर ही कारवाई करण्यात आली आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १,१३५ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, २७ लाख ८४ हजार ५९९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रिक्षाच्या कारवाईतून ४ लाख ५४ हजार ६००, टॅक्सीच्या कारवाईतून ५९ हजार, हेल्मेटच्या कारवाईतून १ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा, तर पीयूसीच्या कारवाईतून २ लाख ६१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

*चॉइस नंबर्सने मिळवून दिले ३ कोटी*

चाॅईस नंबर्सची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोकांचा याकडे वाढता कल पाहता अशा नंबर्ससाठी शासनाने काही रक्कम आकारण्याचा निर्णय घेतला. यातून एकट्या जळगाव आरटीओला २ कोटी ९६ लाख ८ हजार रुपये मिळाले आहेत.

कोट....

कोरोनामुळे मागील आर्थिक वर्षात महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. तरीदेखील आटोकाट प्रयत्न करुन १०५ कोटींच्या जवळ पोहोचलो आहेत. यंदादेखील अशीच परिस्थिती आहे.

- श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

*दृष्टिक्षेपात आरटीओचा महसूल*

महसुलीचे उद्दिष्ट : १४४ कोटी ५३ लाख

प्राप्त महसूल : १०४ कोटी ८६ लाख

महसुलात घट : ३९ कोटी ७० लाख