शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस ते भाजप व्हाया समाजवादी पार्टी : डॉ.राधेश्याम चौधरी यांनी अवघ्या आठ दिवसांत बदलले दोन पक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 12:26 IST

बदलती राजकीय निष्ठा बनली राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय

जळगाव : गेल्या पाच वर्षांपासून भाजपावर कडाडून टीका करणारे व आयुष्यात कधीही भाजपात जाणार नाही, असा दावा करणारे काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी यांनी अवघ्या आठवडाभराच्या कालावधीत विधानसभेच्या उमेदवारीसाठी समाजवादी पार्टीत तर माघारीनंतर गुरूवारी भाजपात प्रवेश केला. त्यांची बदलती राजकीय निष्ठा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर पक्षाचा एकही आमदार जिल्ह्यातून निवडून येऊ शकला नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने जळगाव शहर मतदार संघातून वैद्यकीय व्यावसायिक असलेले डॉ.चौधरी यांना उमेदवारी दिली ह ोती. यातत्यांना केवळ ४ हजार १४ मते मिळाली होती. त्यानिवडणुकीपासूनच त्यांनी २०१९ च्या विधानसभेच्या दृष्टीने तयारी सुरू केली होती. पाच वर्ष त्यांनी अस्तित्वहीन होत आलेल्या शहर काँग्रेसच्यावतीने शहरातील समस्यांबाबत लहान-मोठे आंदोलने केली. महामार्गाच्या समांतर रस्त्यांच्या मागणीसाठी त्यांनी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते दररोज टष्ट्वीटरवर टष्ट्वीट करून काम मार्गी लावण्याबाबत आठवण करून देत होते. आतापर्यंत त्यांनी ९२० टष्ट्वीट केले होते.भाजपवर असायचा टीकेचा रोखडॉ.चौधरी हे आंदोलन, पत्रपरिषद, प्रसिद्धी पत्रकांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडताना मनपातील तसेच राज्य व केंद्रातील सत्ताधारी भाजपावर त्यांचा टीकेचा रोख असायचा.उमेदवारी न मिळाल्याने नाराजकाँग्रेसने या विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेससोबत आघाडी केली. त्यात मागील निवडणुकीत जेथे राष्टÑवादी पहिल्या क्रमांकावर होती, ते मतदारसंघ राष्टÑवादीला सोडण्यात आले. २०१४ मध्ये राष्टÑवादीचे उमेदवार मनोज दयाराम चौधरी यांना ४८३५ मते तर डॉ.चौधरी यांना ४०१४ मते होती. त्यामुळे जळगाव शहर मतदार संघ पूर्वीच्या जागा वाटपानुसार काँग्रेसकडे असूनही यंदा राष्टÑवादीला सोडण्यात आला. त्यामुळे काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने ते नाराज झाले. ५ आॅक्टोबरला त्यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ‘माझा काय दोष आहे? असे टष्ट्वीट केले होते.तर ७ आॅक्टोबर रोजी केलेल्या टष्ट्वीटमध्ये ‘पक्षाची प्रतिष्ठा वाढविणाऱ्या तरूण नेतृत्वाची जणू राज्याच्या नेतृत्वाने राजकीय हत्याच करायचा चंग बांधलेला दिसतो’ अशी नाराजी व्यक्त केली होती.डॉ. राधेश्याम चौधरी यांचा भाजपमध्ये प्रवेशउमेदवारी मिळत नसल्याने नाराज असलेले डॉ.चौधरी २ आॅक्टोबर पर्यंत काँग्रेसमध्येच होते. काँग्रेस भवनातील गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या कार्यक्रमालाही उपस्थित होते. काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्यानंतर डॉ.चौधरी यांनी ५ आॅक्टोबरला समाजवादी पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र ७ आॅक्टोबर ही उमेदवारी माघारीची शेवटची मुदत होती. त्याच दिवशी े पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉ.चौधरी यांना उमेदवारी मागे घेण्याबाबत फोन केला. त्यासोबतच नुसता अर्ज मागे घेऊ नका, भाजपात या, कोणते पद पाहिजे ते बोलून घ्या, अशी आॅफरच दिली. अन् डॉ.चौधरी यांनी गुरूवार, १० आॅक्टोबर रोजी गिरीश महाजन यांच्या उपस्थितीतच भाजपात प्रवेश केला.बदलती राजकीय निष्ठा चर्चेत...काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते असलेले डॉ.चौधरी पुरोगामी विचारसरणीचे. मात्र उमेदवारी मिळत नाही, म्हटल्यावर त्यांनी समाजवादी पार्टीकडे धाव घेतली. तर उमेदवारी दाखल केल्यानंतर दोन दिवसांत त्यांना भाजप प्रवेशाची आॅफर येताच त्यांनी उमेदवारी मागे घेतली व गुरूवारी भाजपात प्रवेश केला. आठवडा भराच्या कालावधीतच हे सर्व घडले. त्यामुळे राजकीय निष्ठा इतक्या झटपट बदलू शकतात? याबाबत सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळातही चर्चा होत आहे.काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी गुरुवारी दुपारी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे स्वागत केले. भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे डॉ. चौधरी यांचे स्वागत असल्याचे सांगत त्यांच्या प्रवेशाने भाजपला बळ मिळेल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. या वेळी आमदार सुरेश भोळे यांनीही डॉ. चौधरी यांच्यासोबत हस्तांदोलन करीत त्यांचे स्वागत केले.-गिरीश महाजन, पालकमंत्रीपक्षाशी लोक जुळवून संघटना वाढविणे हे आपले कामच आहे. अध्यक्ष म्हणून मी त्यांचे स्वागत करतो. आज भाजपच विकास करू शकतो, असा विश्वास असल्याने भाजपमध्ये प्रवेश सुरू आहे. चांगली मंडळी आल्याने पक्षाला त्यांचा लाभच होणार असून डॉ. राधेश्याम चौधरी हे अभ्यासू व्यक्तीमत्व आहे.-आमदार सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष, भाजपडॉ़ राधेश्याम चौधरी यांचा निर्णय अत्यंत धक्कादायक आहे़ त्यांनी पक्ष अडचणीत असताना पक्षाच्या बाजूने उभे राहायला हवे होते़ मात्र, पक्ष सोडत त्यांनी पक्षाशी प्रतारणाच केली आहे़ प्रत्येक पक्षात मतभेद असतात़ शेवटी पक्ष मोठा असतो़ कोणताही पक्ष संपत नाही, काँग्रेसकडेही सक्षम कार्यकर्ते असून ते पक्षाला मोठ करतीलच.-अ‍ॅड़ संदीप पाटील,जिल्हाध्यक्ष काँग्रेसकाँग्रेस पक्षाशी डॉ़ चौधरी एकनिष्ठ राहिले व त्यांनी पक्षासाठी अनेक कामे केली आहेत़ परंतु, पक्षाकडूनच त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले़ त्यांना हवा तसा प्रतिसाद पक्षाकडून मिळाला नाही़ त्यांना भाजपात जाण्याची संधी मिळाली असेल तर ती का सोडावी़-साजीद हुसन्नोदीन शेख, चेअरमन, कोअर कमिटी, समाजवादी पाटीडॉ़ राधेश्याम चौधरी यांना पुढचे राजकीय भविष्य दिसत नसल्यामुळे त्यांनी संधीसाधूपणा साधत भाजपात प्रवेश केला आहे़ चौधरी यांना काँग्रेसकडून अंतर्गत विरोध होता तर समाजवादी पार्टीकडून नामांकन अर्ज भरल्यानंतरही विरोध झाला होता़ फक्त उमेदवारीसाठी त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला़-अशपाक पिंजारी, माजी महानगराध्यक्ष, समाजवादी पार्टीर् .

टॅग्स :Jalgaonजळगाव