शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रावेरमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेचे गाऱ्हाणे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 11:56 IST

रावेरला नळ पाणीपुरवठा योजनेचे गाऱ्हाणे आजही कायम आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे हाल थांबेनादोन नवीन पर्यायी ७५ अश्वशक्तीचे मोटार पंप व बिघाड झालेल्या ७५ अश्वशक्तीच्या मोटार पंपाना 'कोरोना'चं रोनं

हाल : दोन नवीन पर्यायी ७५ अश्वशक्तीचे मोटारपंप व बिघाड झालेल्या ७५ अश्वशक्तीच्या मोटारपंपांना 'कोरोना'चं रोनंरावेर : शहरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या ऐनपूर शिवारात तापीनदी काठी असलेल्या जॅकवेलच्या दोन्ही ७५ अश्वशक्तीच्या मोटारपंपात सदोष तांत्रिक बिघाड होणे हे आता दरवर्षी नित्त्याचे झाले आहे. असे असतानाही, नवीन दोन ७५ अश्वशक्तीच्या मोटारपंपांची पर्यायी व्यवस्था पालिकेकडून होऊ शकली नाही. गतवर्षी केलेल्या दोन नवीन ट्युबवेलवरून थेट जलशुद्धीकरण प्रकल्पाला संयोजन जोडून कायमस्वरूपी तातडीची उपाययोजना पालिकेकडून केली जाणार आहे. यामुळे गुरुवारपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत झाल्याची माहिती मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी दिली.        रावेर शहराला दररोज २५ लाख लीटर्सचा नळपाणीपुरवठा करणार्‍या ऐनपूर जॅकवेलच्या दोन्ही ७५ अश्वशक्तीची क्षमता असलेल्या मोटारपंपांत तीन-चार दिवसांपासून पंपात तांत्रिक बिघाड झाल्याने शहराचा नळपाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यात स्टेशनरोडवरील नागरी वसाहती जास्त प्रभावीत झाल्या आहेत. ही समस्या गतवर्षी दुष्काळाच्या भीषण दाहकतेत निर्माण झाली होती. यंदा मात्र तापी नदीपात्रात मुबलक पाणी असतानाही बिघाड झाला. दरवर्षी जॅकवेलच्या मोटारपंपात तांत्रिक बिघाड निर्माण होतो. शहराला दररोजच्या २५ लाख लीटर पाण्याची गरज पाहता दोन नवीन ७५ अश्वशक्तीचे मोटारपंप खरेदी करून पर्यायी व्यवस्था करणे नितांत गरजेचे आहे.त्या घटनेला पूर्ण वर्ष लोटले तरी संबंधित कंपनीकडे मागणी नोंदवलेले मोटारपंप न.पा.कडे दाखल होऊ शकले नाही. त्याचे कारण म्हणजे सबमर्सिबल पंप निर्माण करणार्‍या कंपन्यांकडील यांत्रिक कामगार निघून गेल्याचे सांगण्यात येते. वर्षभरापूर्वी मागणी नोंदवली असती तर कंपनी दोन ७५ अश्वशक्तीच्या मोटारपंपांची निर्मिती करू शकली असती.दरम्यान, नगरसेवक सुधीर पाटील व नगरसेवक रंजना गजरे यांनी न्यायालयाच्या आवारा शेजारील नवीन दोन ट्युबवेलचे संयोजन थेट जलशुद्धीकरण केंद्रात जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीशी जोडून कायमची पर्यायी व्यवस्था करण्याबाबत रेटा लावला होता. त्या अनुषंगाने दोन्ही ट्युबवेलचे संयोजन मुख्य जलवाहिनीला जोडण्याची धडक मोहीम सुरू आहे. गुरुवारपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी सांगितले. 

टॅग्स :WaterपाणीRaverरावेर