शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

तक्रारदार महिलेला निरीक्षणाखाली ठेवणार; आशादीप वसतिगृह प्रकरणी निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 5:49 AM

या प्रकरणात आतापर्यंत ४३ जणांचे जबाब घेण्यात आले. यात या वसतिगृहात स्वच्छता आणि मुलींच्या जेवणाची आबाळ होत आहे, गर्भवती महिलांना देखील सकस जेवण मिळत नाही, या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाहीत, तसेच ही इमारत खासगी जागेत आहे, असे निरीक्षण नोंदविण्यात आल्याची माहिती मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : आशादीप वसतिगृहातील त्या कथित प्रकरणातील तक्रारदार तरुणीची मानसिक स्थिती चांगली नसल्याने तिला तीन दिवस निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, हे वसतिगृह शासकीय जागेवर हलविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणात आतापर्यंत ४३ जणांचे जबाब घेण्यात आले. यात या वसतिगृहात स्वच्छता आणि मुलींच्या जेवणाची आबाळ होत आहे, गर्भवती महिलांना देखील सकस जेवण मिळत नाही, या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाहीत, तसेच ही इमारत खासगी जागेत आहे, असे निरीक्षण नोंदविण्यात आल्याची माहिती मिळाली. रहिवाशांचा विरोध लक्षात घेता शासकीय इमारतीत हे वसतिगृह हलविण्यासंदर्भात लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.

या वसतिगृहातील एका महिलेने आपणास कपडे उतरवून नृत्य करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता. या प्रकाराची चौकशी रात्री उशिरापर्यंत आशादीप वसतिगृहात आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात सुरू होती. त्यावेळी या प्रकरणातील साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय, आशादीप वसतिगृह व महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याबाबत महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. भाजपच्या नेत्यांनी या प्रकरणी बेजबाबदार विधाने करुन जळगावची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला.

तक्रारदार संघटनेने घेतली पोलीस अधीक्षकांची भेटया प्रकरणाची तक्रार करणारे जननायक फांउडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी व सहकाऱ्यांनी गुरुवारी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम कथन केला. बुधवारी गुप्तचर यंत्रणा, सीआयडी तसेच चौकशी समितीनेही जबाब नोंदविले.