शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा-अंकलेश्वर रस्त्याची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 20:44 IST

सा.बां. विभागाकडून दुर्लक्ष : मुरूम टाकण्याचेही सौजन्य नाही

चोपडा : चोपडा-अंकलेश्वर रस्त्याची चाळणी होऊन तीनतेरा झाले आहेत. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाकडून डोळेझाक होत असून त्याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.शहरातील प्रताप विद्या मंदिरापासून ते अंकलेश्र्वर ब-हाणपूर मार्गाला जोडणा-या जुन्या शिरपूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तेथून पुढे अंकलेश्वर महामार्गाची हद्द सुरू होते. मात्र या महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांंमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माती वा बारीक मुरूम भरण्याचे कष्टही घेतले जात नाहीत.एखादा मोठा अपघात झाल्यावरच गांभीर्याने दखल घेतली जाईल काय? अशा प्रतिक्रिया वाहन धारकांकडून व्यक्त होत आहेत. काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधींंचा निधी देण्यात आला होता. पण काम निकृष्ट झाले असल्याने संपूर्ण रस्ता अत्यल्प काळात खराब झाला आहे. शहरातील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयापासून पालिका हद्दीतील रस्त्यासाठी दीड कोटीचा निधी मिळाला आहे. मात्र काम पावसामुळे सुरू करता येत नसल्याचे समजले आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गावरील खड्डे मुरूमाने भरावेत, अशी मागणी वाहनचालक तसेच नागसरिकांतून होत आहे.

पावसाच्या उघडिपीनंतर काम सुरू करणारचोपडा अंकलेश्वर रस्त्यावर ठिकठिकाणी रस्ता खूप खराब आहे. त्याबाबत विचारले असता, त्यात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दोन वेळा मुरूम भरला आहे. पुन्हा पाऊस बंद झाला की मुरूम टाकून खड्डे भरले जातील. सततच्या पावसामुळे भरलेला मुरूम टिकत नासल्याने पुन्हा खड्डे तयार होत आहेत. चांगली उघडीप मिळाली की पुन्हा काम सुरू केले जाईल. राहिलेल्या काही भागात नवीन डांबरीकरण केले जाईल, अशी माहिती चोपडा सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी पी.जे. शुशिर यांनी दिली.