शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

सुकळी जंगलात साळींदरची शिकार

By admin | Updated: March 16, 2017 00:09 IST

कु:हा काकोडा : अवैध शिका:यांमुळे वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात

कु:हा-काकोडा : वढोदा वनक्षेत्रातील डोलारखेडा परिमंडळामार्फत येणा:या सुकळी नियतक्षेत्रात शिका:यांनी साळींदर (सायल) प्राण्याची शिकार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये कमालीची नाराजी आहे. अवैध शिका:यांचा राबता वाढल्यामुळे या जंगलातील वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात आल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पट्टेदार वाघाच्या अधिवासासाठी पोषक असलेल्या डोलारखेडा परिमंडळात सुमारे आठवडाभरापूर्वी ही घटना घडली. सुकळी नियतक्षेत्रातील वनखंड 540 मध्ये अज्ञात शेतक:यांनी ही शिकार केली असून जमिनीत खोलवर भुयार करून राहणा:या प्राण्यास जमिनीबाहेर काढण्यासाठी या ठिकाणी सुमारे सहा फुटांचे सहा खड्डे खोदण्यात आले आहेत. याच खड्डय़ांच्या माध्यमातून भुयारात कळपाने राहणा:या साळींदरांना या शिका:यांनी ठार मारले असल्याचे बोलले जात आहे. याच ठिकाणी साळींदारांच्या अंगावरील काटय़ांचा ढीग पडलेला होता. यावरून शिका:यांनी शिकार करून त्यांचे काटे येथेच टाकल्याचे बोलले जात आहे. घटनेसंदर्भात समजताच वनक्षेत्रपाल बी.बी. जोमीवाले यांनी  चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार वनपाल विजय फणसे, वनरक्षक डी.एस.पवार, वनमजूर संजय सांगळकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या वेळी त्यांना साळींदरांचे काटे आढळून आले. तसेच घटनास्थळी काहीतरी जाळल्याच्या खुणा सापडल्या. खड्डे खोदण्याआधी शिका:यांनी आजूबाजूच्या वृक्षांची मोठय़ा प्रमाणात कत्तल केली. मात्र याबाबत वनविभागात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे समजते. वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात डोलारखेडा परिमंडळात याआधी पट्टेदार वाघीण मृतावस्थेत आढळली होती. त्यावरून वनविभागाचा निष्काळजीपणा चव्हाटय़ावर आला होता. त्यानंतर हरणांचा कुजलेला अवस्थेतील सांगाडा सापडला होता. आता साळींदरची शिकार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या तिन्ही घटनेतील साम्य म्हणजे घटना घडून आठवडा उलटल्यानंतरसुद्धा वनविभागाला त्याचा थांगपत्ता नव्हता. सजग नागरिकांनी सांगितल्यावर व ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतच वनविभागाला जाग आली होती. अशा प्रकारामुळे खरंच वन्यजीव सुरक्षित आहेत काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिका:यांची टोळीच सक्रि य साळींदरची शिकार करणे अतिशय कठीण काम असते. भुयारी खड्डे खोदण्यासाठी लागणारा वेळ, मेहनत व धाडस याचा विचार करता हे अट्टल शिका:यांच्या टोळीचे काम असल्याचे स्पष्ट होते. कॅमेरे धुळखात वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी व वनगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वनविभागाकडे असलेले ट्रॅप कॅमेरे अपूर्ण मनुष्यबळामुळे कार्यालयातच धुळखात पडल्याचे समजते. त्यासाठी लागणा:या मजुरीचे पैसे नसल्याचे सांगण्यात येते. वनरक्षकाचा अतिरिक्त पदभार वाघाचा राबता असलेल्या दक्षिण डोलारखेडा नियतक्षेत्रात वनक्षेत्राचे पद वर्षभरापासून रिक्त असून अतिरिक्त पदभारावर जंगलाचे संरक्षण अवलंबून आहे. याचाच फायदा गुन्हेगार उचलत आहे.(वार्ताहर)सुमारे दहा ते बारा दिवसांपूर्वी सदर घटना घडली असून त्याबाबत वनपालांना चौकशीचे आदेश दिले आहेत. पंचनामा झाला आहे. साळींदराचे काटे सापडले, मात्र उलट अवयव घटनास्थळी आढळले नाही. स्थानिकांनीच हा प्रकार केला असल्याचा अंदाज आहे.- बी.बी. जोमीवाले, वनक्षेत्रपाल वढोदा,ता.मुक्ताईनगर,जि.जळगाव