शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

बाल साहित्य हे आयुष्य घडविण्याचे ‘साधन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:45 IST

जळगाव : आजची मुले ही खूप प्रगल्भ आहेत. लहान पणापासूनच त्यांना सर्व काही समजायला लागते. मोबाईलमुळे तर ही मुले ...

जळगाव : आजची मुले ही खूप प्रगल्भ आहेत. लहान पणापासूनच त्यांना सर्व काही समजायला लागते. मोबाईलमुळे तर ही मुले एकाकी होत आहेत. पुढे चालून या बालकांचा यंत्र होऊ द्यायचा नसेल तर त्यांच्या हातात चांगली पुस्तके वाचायला द्या. ही बाल साहित्यांची पुस्तके क्रिया नसून, तर आयुष्य घडविण्याचे खरे साधन आहे. असे मत नामवंत लेखक डॉ. सुरेश सावंत (नांदेड) यांनी रविवारी मांडले.सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगावतर्फे रविवारी भास्कर मार्केट जवळील अखिल भारतीय जैन संघटनेच्या सभागृहात एक दिवसीय सुर्योदय बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. सावंत हे बोलत होते.तत्पूर्वी सकाळी संमेलनाचे उद्घाटन जळगावातील बाल साहित्यिक गिरीश पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. व्यासपीठावर कवयित्री माया धुप्पड , संघपती दलुभाऊ जैन, उज्ज्वला टाटीया, सुर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन उपस्थित होते. दरम्यान,यावेळी संमेलनस्थळाला कवयित्री बहिणाबाई चौधरी सभागृह, व्यासपीठाला साने गुरुजी व्यासपीठ तर प्रवेशद्वाराला बालकवी नगर,धो. वे. जोगी प्रवेशद्वार असे देण्यात आले होते.यापुढे डॉ. सुरेश सावंत यांनी सांगितले की, कोवळ््या मुलांना संस्कारित करण्यासाठी आतापासूनच संस्कार रुजविणे गरजेचे आहे. ‘शब्द’ लिहायला किंवा वाचायला शिकविणारे शिक्षक आपल्याला खूप सापडतील. पण शब्द जगायला शिकविणारे शिक्षक सापडणे, दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अशा परिस्थितीत बाल साहित्यातील ‘शब्दच’ मदतीला धावून येत असल्याचे सांगितले. यावेळी बाल साहित्यिक योगेश पाटील यांनी, सामाजिक विकृतींना आळा घालण्यासाठी साहित्यनिर्मिती करणे, ही आपली जबाबदारी असून, लेखणी नावाचे शस्त्र आपल्याकडे आहे. कारण लेखनीने मने जिंकता येतात, युद्धे नाहीत आणि युद्धाने जग जिंकता येते, माणसे नाहीत. असे सांगत बदलत्या काळानुसार साहित्य प्रवाह कायम टिकून रहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. दुसऱ्या सत्रात कथाकथन झाले. यामध्ये सुभाषचंद्र वैष्णव (ह.मु. गोवा) व एकनाथ आव्हाड (मुंबई)यांनी सहभाग घेतला. तिसºया सत्रात शब्द झंकार या कविसंमेलनात डॉ. अशोक कोळी यांच्यासह विविध कविंनी कविता सादर केल्या.मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरणसंमेलनाध्यक्ष डॉ. सुरेश सावंत यांच्याहस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये सूर्योदय बालमित्र पुरस्कार सुभाषचंद्र वैष्णव व एकनाथ आव्हाड यांना देण्यात आला. तर सुर्योदय बालनाट्य पुरस्कार मुंबई येथील ज्योती कपिले यांच्या ‘कोडी झाली नाटुकली’ या बालनाट्य लेखास देण्यात आला. तसेच सुर्योदय बालकाव्य पुरस्कार औरंगाबाद येथील गणेश घुले यांच्या ‘सुंदर माझी शाळा’ या बालकाव्य संग्रहास देण्यात आला. सूत्रसंचालन वैदेही नाखरे तर आभार सतिश जैन यांनी मानले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव