शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये क्रांतीचा जयजयकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 13:29 IST

विविध उपक्रम : क्रांतीवीरांना ंआदरांजली,

जळगाव : क्रांतीदिन शुक्रवारी विविध शाळांमध्ये उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी क्रांतीवीरांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच क्रांतिकारकांच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला.प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालयमातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालयात क्रांतिदिन साजरा करण्यात आला. शिक्षिका रूपाली वानखेडे या अध्यक्षस्थानी होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहिद झालेल्या हुतात्म्यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली.सूत्रसंचालन सानिया कुशवाह हिने तसेच आभार प्रदर्शन श्रृष्टी जयस्वाल हिने केले. विद्यार्थी भाषणामध्ये संदेश तिवारी, सानिया शाह, प्रशांत कवळे, काजल राठोड, निकिता शिरसाठ, नंदिनी चव्हाण, रजनी तायडे, आशिष राठोड, प्रणाली गायकवाड, तब्सुम पटेल, अस्मिता चव्हाण यांनी सहभाग नोंदविला. यशस्वीतेसाठी गजानन सूर्यवंश्ी, अविनाश महाजन, मोहिनी चौधरी, धनश्री फिरके, लिना नारखेडे, तुषार नारखेडे तसेच दिपक भोळे यांनी विशेष परिश्रम घेतले.रावसाहेब रुपचंद विद्यालयआर. आर. विद्यालयात क्रांती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक विजय रोकडे, प्रभावती बावस्कर, प्रमुख वक्ता चारूलता पाटील उपस्थित होते. विजय रोकडे यांनीदेखील क्रांतीकारकांच्या आठवणी सांगितल्या. सूत्रसंचालन तुषार पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार डी. बी. पांढरे यांनीमानले.चांदसरकर प्राथमिक विद्यामंदिरखान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै. गिरीजाबाई नथ्थूशेठ चांदसरकर प्राथमिक विद्यामंदिर, साने गुरूजी कॉलनी या शाळेत सुरूवातीला सर्वप्रथम देशातील ज्या महान व्यक्तींनी बलिदान दिले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक श्याम ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना क्रांतीदिनाची माहिती सांगितली. शाळेतील उपशिक्षिका जयश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले व जयश्री मेने यांनी आभार मानले.या कार्यक्रमात शाळेतील सर्व २० विद्यार्थ्यांनी भाषणे केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्चना बाविस्कर, शारदा चौधरी, अनिता वाघमारे, पुनम पाटील, जयश्री खडके, स्वप्निल भोकरे, अमोल सोनकुळ, महेश तायडे, विवेक कोठावदे, भूषण अमृतकर यांनी परिश्रम घेतले.सिद्धीविनायक विद्यालयजुन्या औद्योगिक वसाहतमधील सिद्धीविनायक प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुरुवातीला सरला वाडीले यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.याप्रसंगी नगरसेविका लता सोनवणे, पालक-शिक्षक संघाच्या कविता तायडे, मुख्याध्यापक आर. पी. खोडपे, गुलाबराव पाटील हे उपस्थित होते. विद्यालयातील हर्षल भामंदे, पवन गव्हाणे, टिनू राणे, तेजस मुजाल्दे, सोनल पाटील, काजल डांगे व देवयानी शिंदे या विद्यार्थ्यांनी भगतसिंग, सुखदेव व राजगुरू, चंद्रशेखर आझाद, वासुदेव फडके, नाना पाटील या क्रांतिकारकांची माहिती उपस्थितांना देऊन त्यांच्या महान कार्याची ओळख करून दिली. विद्यालयातील उपशिक्षक सुनील डांगरे, अनिल पावरा या शिक्षकांनी क्रांतिदिनाचे महत्व विषद केले. सूत्रसंचालन आर. एस. पाटील व आभार मुख्याध्यापक आर. पी. खोडपे यांनी मानले.प. वि. पाटील विद्यालयगुरुवर्य प. वि. पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्याहस्ते महात्मा गांधी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आदी क्रांतिकारकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.ज्याप्रमाणे क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता देशासाठी बलिदान दिले त्याप्रमाणे आपणसुद्धा देशाच्या विकासासाठी आपल्यापरीने मदत केली पाहिजे, असे मत शिक्षक योगेश भालेराव यांनी व्यक्त केले.एस. ए. बाहेती महाविद्यालयअ‍ॅड. एस. ए. बाहेती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्टÑीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग व एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीदिन, जागतिक आदिवासी दिवस व महाविद्यालयाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी अनेक जणांनी मनोगत व्यक्त केले.प्रगती विद्यामंदिरात वक्तृत्व स्पर्धाक्रांतीदिनाचे औचित्य साधून प्रगती विद्यामंदिर येथे ‘क्रांतिकारकांचे जीवन’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. परिक्षण सुवर्णा पाटील व भाग्यश्री तळेले यांनी केले. नियोजन मनोज भालेराव व संध्या अट्रावलकर, पंकज नन्नवरे, रमेश ससाणे यांनी केले. सूत्रसंचालन विजया पाटील व आभार मनोज भालेराव यांनी मानले. याप्रसंगी मुख्याध्यापिका शोभा फेगडे, मुख्याध्यापिका मनिषा पाटील, अलका करणकर, अविदीप पवार, स्नेहल उदार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव