शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

.. तर ३0२ चा गुन्हा दाखल करणार

By admin | Updated: February 13, 2015 15:34 IST

प्रशासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत जि.प.च्या सर्व अधिकार्‍यांनी जळगाव पंचायत समितीमध्ये सभा घेतली. यात आरोग्य, ग्रा.पं. आणि शिक्षण विभागाच्या तक्रारींसंबंधी सीईओ आस्तिककुमार पांडेय चिडले.

जळगाव : प्रशासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत जि.प.च्या सर्व अधिकार्‍यांनी जळगाव पंचायत समितीमध्ये सभा घेतली. यात आरोग्य, ग्रा.पं. आणि शिक्षण विभागाच्या तक्रारींसंबंधी सीईओ आस्तिककुमार पांडेय चिडले. दुर्लक्ष, चालढकल यामुळे विद्यार्थी, ग्रामस्थ यांना धोका निर्माण झाला तर संबंधित कर्मचार्‍यांविरुद्ध ३0२ म्हणजेच खुनाचा गुन्हा दाखल करू, असा इशारा पांडेय यांनी दिला. 
यामुळे कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली. छत्रपती शाहू महाराज सभागृहात गुरुवारी सकाळी हा कार्यक्रम सुरू झाला. जळगाव तालुक्यातील जि.प.सदस्य लीलाबाई सोनवणे, लिना महाजन, सभापती हिराबाई मोरे, सीईओ पांडेय, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील व इतर सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. दुपारी २.३0 वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. सभेत कंडारीत शिक्षकांचा अभाव, आव्हाणे येथे मागासवर्गीय वस्तीत घरांसमोर सांडपाणी असते, म्हसावद आरोग्य केंद्रात अधिकारी व कर्मचारी नसतात आणि नशिराबाद शाळेत शालेय पोषण आहाराची दुरवस्था असल्याच्या तक्रारी आल्या. 
आव्हाणे येथील तक्रारदाराने तर सांडपाण्याची छायाचित्रे सभेत दाखविली. ग्रामसेवकांबाबत नाराजीही व्यक्त केली. या तक्रारींमुळे सीईओ चिडले. गटविकास अधिकारी बी.ए.राठोड यांची त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली. दुर्लक्ष करू नका. मला २८ दिवस झाले. आता तरी सुधारा.. पुढे काहीही ऐकून घेणार नाही, अशी ताकीद सीईओंनी दिली. तसेच विद्यार्थी, ग्रामस्थांच्या आरोग्याच्या जिवाशी खेळ झाला तर थेट खुनाचा गुन्हा दाखल करायला लावेल, असा दमही भरला. आपल्या दारी कार्यक्रमात विदगाव येथील एक दारूड्या शिरला. त्याने पंतप्रधानांच्या स्वच्छता अभियानाबाबत प्रश्न उपस्थित केले. कुठे आहे स्वच्छता वगैरे बोलू लागला. कार्यक्रमात व्यत्यय येऊ लागल्याने संबंधित दारूड्याला सीईओंच्या आदेशानुसार बाहेर काढण्यात आले. 
शालेय पोषण आहार व्यवस्थितपणे द्या, असे गटशिक्षणाधिकार्‍यांना खडसावले. तसेच आरोग्यासंबंधी निष्काळजीपणा करू नका, अशी सूचना आरोग्याधिकार्‍यांना दिली.